Naveen Ul Haq Instagram Story After Rcb Loss Against Gt Rcb Out From Playoff Race Ipl 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Naveen Ul Haq vs Virat Kohli : आयपीएल 2023 मध्ये (IPL 2023) शेवटच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) पराभव केला. गुजरातने आरसीबीवर सहा विकेट्सने विजय मिळवला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. या सामन्यात विराट कोहलीनं (Virat Kohli) दमदार शतक झळकावलं पण, त्याच्या शतकावर गुजरातच्या शुभमन गिलचं शतक वरचढ ठरलं. कोहलीची शतकी खेळी व्यर्थ ठरली. यामुळे आरसीबी संघ आणि चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. आरसीबीच्या पराभवानंतर अफगाणिस्तानी खेळाडू नवीन उल-हकने पुन्हा एकदा विराट कोहलीला डिवचलं आहे.

आरसीबीच्या पराभवानंतर नवीन उल हकनं कोहलीला डिवचलं

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या यंदाच्या सोळाव्या हंगामात कोहली विरुद्ध नवीन उल-हक यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. आयपीएल 2023 मध्ये विराट कोहलीचा नवीन उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. आता पुन्हा एकदा नवीन उल-हकने कोहलीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. आरसीबीमधून बाहेर पडल्यानंतर लखनौ संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकने पुन्हा एकदा त्याच्या सोशल मीडिया स्टोरी पोस्ट करत आरसीबी संघाची खिल्ली उडवली आहे.

पाहा नवीन उल-हकची इंस्टाग्राम :

नवीन उल हकची इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

आरसीबीच्या पराभवानंतर लखनौ संघाचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. नवीनने या स्टोरीमध्ये एका व्यक्तीचा हसणारा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवरून स्पष्टपणे असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा आरसीबी आणि कोहलीची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न आहे. विराट कोहलीसोबतचे मैदानावरील भांडण नवीन अद्यापही विसरलेला नाही, हे यावरून स्पष्ट होतं. 

गुजरातकडून बंगळुरुचा पराभव

यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. 21 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलं होतं. प्लोऑफमधील चौथ्या आणि शेवटच्या जागेसाठी बंगळुरू आणि मुंबई यांच्यात लढत होती. मुंबई संघाने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादचा पराभव करून 16 गुणांपर्यंत मजल मारली. पण आरसीबी संघाला गुजरात विरुद्धचा शेवटचा सामना जिंकता आला नाही आणि 14 गुणांसह त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts