[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
उल्लेखनीय आहे की एकदिवसीय आणि कसोटी सामने भारतीय वेळेनुसार उशिरा संपत होते, परंतु चाहत्यांना टी-२० मालिकेची वेळ आवडेल. चला जाणून घेऊया हा सामना कुठे खेळला जाणार आहे आणि चाहते लाइव्ह कसे पाहू शकतील…
भारत आणि वेस्ट इंडिजमधील टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. ही टी-२० मालिका आज म्हणजेच ३ ऑगस्टपासून खळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा, त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. भारत आणि वेस्ट इंडिजमधील टी-२० सामने रात्री ८ वाजता सुरु होणार आहेत आणि या सामन्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होईल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना दूरदर्शन स्पोर्ट्स चॅनलवर प्रसारित होणार आहे. तर या सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट फॅन कोड वेबसाइट आणि अॅपवर उपलब्ध असेल. Jio Cinema वेबसाइट आणि अॅपवर फ्रीमध्ये लाइव्ह सामना पाहता येणार.
भारताचा टी-२० संघ: इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
[ad_2]