नवी दिल्ली: आयपीएल २०२३मधील साखळी फेरीतील लढती संपल्या आहेत. आता प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनौ सुपर जायंटस आणि मुंबई इंडियन्स या चार संघात लढती होतील. काल रविवारी झालेल्या अखेरच्या दोन साखळी लढतीत मुंबईने हैदराबादचा दर गुजरातने बेंगळुरूचा पराभव केला.आरसीबीविरुद्ध गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने नाबाद शतकी खेळी केली. या विजयात गिलने त्याच्या वाटेतील मोठा अडथळा दूर केला. आयपीएलच्या १६व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फाफ डु प्लेसिस अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. आता आरसीबीचा संघ साखळी फेरीतच बाद झाल्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीतून फाफ आणि विराट मागे पडले आहेत. गिलने शतकी खेळी करत संघाला विजय मिळून दिला आणि पर्पल कॅपच्या शर्यतीतील दोन मोठे खेळाडू बाद केले.
WTC फायनलच्या तोंडावर विराट कोहलीला दुखापत; एका कॅचने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, कोच म्हणाले…
शुभमन गिलने १४ डावात ५६.६७च्या सरासरीने ६८० धावा केल्या. यात २ शतकांचा समावेश आहे. फाफच्या नावावर १४ डावात ७३० धावा आहेत. तर विराटच्या नावावर ६३९ धावा आहेत. पहिल्या स्थानावर असलेल्या फाफला मागे टाकण्यासाठी गिलला आता फक्त ५१ धावांची गरज आहे आणि त्यासाठी त्याला किमान २ ते ३ संधी मिळणार आहेत. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये गुजरात जिंकला तर गिलला दोन संधी मिळतील आणि पराभव झाला तर एलिमेनेटरमध्ये विजय मिळून संघ फायनलमध्ये केला तर ३ संधी मिळतील.
प्लेऑफमध्ये प्रवेश करताना CSKने केला IPL इतिहासातील महाविक्रम; पराभवात ही वॉर्नर झाला हिरो
आयपीएलच्या १६व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यशस्वी जयसवाल ६२५ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर डेवॉन कॉन्वे असून त्याच्या नावावर ५८५ धावा आहेत. कॉन्वे चेन्नईकडून खेळतो पण त्याच्यात आणि गिलमध्ये धावांचे अंतर जास्त आहे. गुजरातच्या या विजयाने सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल तर तो मुंबई इंडियन्सला होय. आता क्वॉलिफायर १ मध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई अशी लढत होईल. तर एलिमेनेटरमध्ये लखनौ विरुद्ध मुंबई अशी मॅच होईल.
मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव