Anushka Sharma And Virat Kohli Get Clicked At The Airport WTC Final 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli, WTC Final 2023 : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी (WTC Final 2023) सज्ज झालाय. विराट कोहली इंग्लंडला रवाना झालाय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आज मुंबईतून इंग्लंडसाठी रवाना झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झालाय. आरसीबीचे आयपीएलमधील आव्हान संपल्यानंतर विराट कोहलीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंडला रवाना झालाय. विराट कोहलीशिवाय मोहम्मद सिराजही इंग्लंडला रवाना झालाय. सिराज हैदराबाद विमानतळाहून इंग्लंडकडे रवाना झालाय. सिराजने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली.

टीम इंडियाची पहिली बॅच लंडनमध्ये दाखल होणार
भारतीय संघ तीन बॅचमध्ये लंडनमध्ये दाखल होणार आहेत. पहिली बॅच आज रवाना  झाली आहे. विराट कोहली दोन आठवडे सराव करणार आहे. पहिल्या बॅचमध्ये विराट कोहलीसह रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे प्रमुख खेळाडू असतील. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज रवाना झाल्याचे समोर आलेय. इतर खेळाडूंबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. ते खेळाडू आजच पवाना होणार आहेत.

सात जूनपासून रंगणार थरार

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

India vs Australia, WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कोण कोणते खेळाडू आहेत ?

Team India : टीम इंडिया  
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर) 

Team Australia : टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.



[ad_2]

Related posts