Education Department Issued New Guidelines What Exactly Should Be Written On Notebook Pages In Textbooks

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पाठ्यपुस्तकांतील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना शालेय शिक्षण विभागाने नव्याने दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. ही पृष्ठे ‘माझी नोंद’ या शीर्षकाखाली देण्यात आली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. या पाठ्यपुस्तकांतील पृष्ठांचा प्रभावी आणि सुयोग्य वापर होण्याच्या हेतूने शिक्षकांसाठी परिपत्रक जाहीर केले आहे.  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ‘माझी नोंद’ यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये असं त्यात म्हटलं आहे.

या पानांचा वापर, सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल.

– विदयार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात.
– वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी.
– महत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी.
– वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी. 
– काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती, साहित्यांची नोंद घेणे. 
– पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची 
– पाठ्यपुस्तकांबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी.
– पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे.
– अध्ययन-अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे. 
– चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी. पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी

कच्चे काम (पेन्सिलने), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करणे, पडताळणी करणे इत्यादी. नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नोंद, तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिर्मित उदाहरणांची नोंद. शब्दार्थ, प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे. नोंदवणे. सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ. 

या उपक्रमाचा उद्देश पुढीलप्रमाणे आहे, 

1. एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल, त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
2. पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.
3. नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल, त्यामुळे प्रत्याभरण (Feedback) आणि दृढीकरण (Fixation) होईल.
4. विद्यार्थ्यांना स्वत:च्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील आणि सवय त्यांच्या अंगवळणी पडेल. शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना ‘माझी नोंद’ यामध्ये नोंदवता येतील.
5. त्यांचे स्वत:चे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल. 
6. स्वत:चे मुद्दे विदयार्थ्यांना काढता येतील.
 7. आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.
8. अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.
9. अध्ययनासाठी नोंदणीची उपयुक्तता.
10. पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाठाला जोडून लिहिता येईल. 
11. पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.
12. अध्यायनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल.
13. एकाच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.
14. घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल. 
15. पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे समजेल.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

[ad_2]

Related posts