[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी एका चार वर्षांच्या मुलाच्या ८० वर्षीय पणजोबाला अटक केली असून, दीड महिन्याच्या जुन्या खून प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आहे. मातृगृहात राहणाऱ्या मुलामुळे कुटुंबीयांना त्रास होत असल्याने वृद्धाने आपल्याच पणतूचा हा खून केला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिस अधीक्षक हितिका वासल यांनी सांगितले की, क्षिप्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ एप्रिल रोजी रात्री चार वर्षीय श्रेयांश चौधरीची हत्या केल्याप्रकरणी त्याचे पणजोबा शोभाराम चौधरी (८०) यांना अटक करण्यात आली आहे. श्रेयांशची आई नीतू आपल्या पतीसोबतच्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत तिच्या पालकांच्या घरी राहत होती आणि स्पर्धा परीक्षेची तयारीही करत होती.
मुंबईत रेड लाइट एरिया कुठे आहे?; रिक्षाचालकाला विचारताच यूपीतील जोडपे गजाआड, वाचले १८ वर्षीय मुलीचे आयु्ष्यपणजोबाला वाटायचे पणतूमुळे घरात संकट आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरी राहत असलेली नीतू आणि तिच्या मुलाला आपल्यावरील ओझं मानत होते. ते नीतूचा मानसिक छळ करायचे आणि तिचा मुलगा मोठा झाल्यावर आईच्या मालमत्तेत वाटेकरी होईल, असे टोमणेही मारायचे. त्यामुळेच नीतूचे आजोबा शोभाराम यांनी पाहिले की, त्याचा पणतू श्रेयांशमुळे त्याच्या कुटुंबात खूप मोठे संकट आले आहे आणि घरात भांडणाचे वातावरण आहे. शोभारामला वाटले की जर हे मूलच मेले तर या समस्या मुळापासून संपतील.
प्रेमाच्या जाळ्यात ओढत विवाहित शिक्षिकेवर अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत दागिनेही केले हडप
पणजोबाने पणतूला तोंडावर चादर दाबून ठार केले
पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, श्रेयांश रोज रात्री त्याचे आजोबा शोभारामसोबत झोपत असे. शोभारामने ७ एप्रिलच्या रात्री चादर दुमडली आणि तोंडावर दाबून मुलाचा ठार मारले. ही तीच चादर होती ज्यावर शोभाराम झोपायचा. मयत मुलाच्या आईच्या बाजूच्या लोकांच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी शोभारामला खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
लोक बघतच राहिले! बीडमध्ये मुलाच्या आईवरील प्रेमाची चर्चा, स्मृती जपण्यासाठी केले जगावेगळे काम
[ad_2]