AirPods lost in Kerala traced in South Goa Ajab Gajab Trending News;केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

( प्रगत भारत । pragatbharat.com)

AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. केरळमधील राष्ट्रीय उद्यानात प्रवास करताना एका इसमाचे एअरपॉड्स हरवले. त्यानंतर पुढच्या दोन मिनिटांत त्याने एअरपॉड्स चोरीला गेल्याची पोस्ट शेअर केली. @niquotein नावाच्या यूजरने एक्स म्हणजेच आधीच्या ट्विटरवर स्टोरी शेअर केली. 

आपले हरवलेले AirPods शोधण्यासाठी त्याने इंटरनेटवर मदत मागितली. ज्या व्यक्तीने माझे एअरपॉड्स चोरले आहेत, तो दोन दिवसांपासून दक्षिण गोव्यात आहे. त्याने अचूक पत्त्याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आणि लोकांना तो व्यक्ती त्या भागात असल्यास AirPods घेण्यास सांगितले.

‘अलीकडेच केरळमध्ये माझे नवीन एअरपॉड चोरीला गेले. चोरी करणारा बदमाश एअरपॉड्ससोबत घेऊन प्रवास करत आहे, अशी पोस्ट त्याने केली. ती व्यक्ती आता दोन दिवस दक्षिण गोव्यात आहे. त्यामुळे एअरपॉड्स तिथे असावेत असा माझा अंदाज आहे. डॉ. अल्वारो डी लोयोला फुर्ताडो रोड, सालसेट, दक्षिण गोव्याच्या आसपास कोणी राहतो का? असा प्रश्न त्याने ट्विटरवर विचारला. 

“जर ट्वीटरने मला माझे एअरपॉड्स शोधण्यात मदत केली तर आजूबाजूच्या मुलांना सांगण्यासाठी किती छान गोष्ट असेल, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये विनोदाने म्हटले. 

ज्या व्यक्तीने त्याचे एअरपॉड्स चोरले त्याने ते अनेक वेळा उघडले आणि बंद केले. मी एअरपॉड्सवर लॉस्ट मोड सक्रिय केला आहे. त्यामुळे तुम्ही कनेक्ट करण्याचा प्रयत्न करताच, माझा नंबर फोनवर येईल, असेही तो म्हणाला. 

सोशल मीडियात ही पोस्ट व्हायरल झाली. त्यावर यूजर्सच्या कमेंट्सचा पाऊस पडायला लागला. गोव्यात असलेल्या अनेकांनी एअरपॉड्स कुठे आहे ते घर शोधून काढलं. गोव्यात आल्यावर एअरपॉड्स देऊ असे एका यूजरने लिहिले. मी पुढील आठवड्यात गोव्यात आहे, जर एअरपॉड्स घेतलेल्या व्यक्तीने सहकार्य केले तर मी ते कलेक्ट करु शकतो, असे त्याने म्हटले. 

मी पुढील 4 दिवस उत्तर गोव्यात आहे. एअरपॉड्स घेणारा जवळपास कुठे असे तर मला DM करावे. मी थोडासा मिरचीचा स्प्रे आणीन आणि दिल्लीचा अॅटीट्यूड घेऊन येईन, असे दुसऱ्या एका युजरने म्हटले. 

तिसऱ्या एका युजरनेही वेगळी कमेंट केली. मी गोव्याचा आहे आणि शेजारी राहतो आणि कोकणी बोलतो. कृपया मला अचूक स्थान DM करा. काय करता येईल का ते मी बघतो, असे त्याने म्हटले. तुम्ही सांताप्रमाणे वेषभूषा करा, घरात प्रवेश करा आणि एअरपॉड्स मागवा, असे त्याने पुढे लिहिले. 

तुम्ही एअरपॉड्स शोधून परत आणाल अशी आशा एकाने व्यक्त केली. तर  दुसर्‍याने लिहिले, एअरपॉड्सच्या या घटनेत पुढे काय होते? यावर लक्ष ठेवू. 

Related posts