[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आयर्लंडने १५ खेळाडूंचा संघ आज जाहीर केला. भारत आणि आयर्लंड यांच्यमध्ये १८ ऑगस्टपासून नियोजित तीन सामन्यांची T20 मालिका सुरु होणार आहे. या आयर्लंडच्या संघात प्रामुख्याने अशा खेळाडूंचा समावेश आहे जे गेल्या महिन्यात यशस्वी विश्वचषक पात्रता मोहिमेचा भाग होते. पण लीन्स्टर लाइटनिंग आणि अष्टपैलू फिओन हँडला संघात पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. जूनमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या मनगटाच्या दुखापतीतून बरे झालेल्या गॅरेथ डेलनीचे पुनरागमन आयर्लंडच्या संघासाठी महत्वाचे असेल.
“स्कॉटलंडमधील अलीकडील पात्रता मोहीम पुढील जूनच्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आमच्या धोरणात्मक नियोजनाचा पहिला टप्पा होता,” अँड्र्यू व्हाईट, आयर्लंड पुरुषांचे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणाले.
आयर्लंडच्या निवड समितीचे अध्यक्ष अँड्र्यू व्हाईट यावेळी म्हणाले की, ” आगामी टी-२० विश्वचषक पाहता या संघाची बांधणी आम्ही केली आहे. कारण या संघातील बरेच खेळाडू टी-२० विश्वचषकातही पाहायला मिळतील. संघातील खेळाडूंना एकत्रितपणे चांगला सराव मिळाला आणि दिग्गज संघांबरोबर खेळताना ज्या चुका होतील त्या सुधारण्यासाठी हे सामने आमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. टी-२० विश्वचचषकापूर्वी आम्ही १५ टी-२० सामने खेळणार आहोत. त्यामधील ही भारताची मालिका आमच्यासाठी महत्वाची असणार आहे.”
आयर्लंडचा T20संघ: पॉल स्टर्लिंग (कर्णधार ), अँड्र्यू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकोम, बेन व्हाइट, क्रेग यंग.
भारताचा आयर्लंड दौऱ्यातील सामने
१८ ऑगस्ट: आयर्लंड विरुद्ध भारत – पहिला T20 सामना (स्थानिक वेळ दुपारी ३ वाजता)
२० ऑगस्ट: आयर्लंड विरुद्ध भारत – दुसरी T20 सामना (स्थानिक वेळ दुपारी ३ वाजता)
२३ ऑगस्ट: आयर्लंड विरुद्ध भारत – तिसरी T20 सामना (स्थानिक वेळ दुपारी ३ वाजता).
[ad_2]