[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs WI 2nd T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आज दुसरा टी20 सामना होत आहे. प्रोव्हिडन्स स्टेडिअममध्ये भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता नाणेफेक होईल. पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने बाजी मारली होती. ब्रायन लारा स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात विडिंजने चार धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी फेल गेली होती.
पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने 150 धावांचे आव्हान दिले होते. विडिंजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 20 षटकात विडिंजने सहा विकेटच्या मोबदल्यात 149 धावा केल्या होत्या. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 9 विकेटच्या मोबदल्यात 145 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिला सामना चार धावांनी जिंकून विडिंजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडिया कमबॅक करणार का ? की वेस्ट इंडिज मालिकेतील आघाडी अधिक भक्कम करणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय.
पिच रिपोर्ट
गयानाच्या प्रोव्हिडन्स मैदानाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल. या मैदानावर झालेले सर्वाधिक सामने लो स्कोअरिंग झाले आहेत. येथील पहिल्या डावाची सरासरी 123 धावांची आहे. जसजसा सामना पुढे सरकतो तसतसा येथे धावा काढणे आणखी कठीण होते. स्लो विकेट फिरकीपटूंना मदत करते. मात्र, नुकत्याच झालेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात या मैदानावर 150 हून अधिक धावांचं आव्हान पाहायला मिळालं. या मैदानावर धावांचा पाठलाग करणारे संघ अनेकदा जिंकतात. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कोण जिंकणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कोणत्याही बदलाशिवाय उतरणार दोन्ही संघ ?
पहिल्या टी 20 सामन्यात विडिंजने बाजी मारली होती. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात विडिंजच्या संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे टीम इंडिया सुद्धा त्याच प्लेईंग 11 वर विश्वास ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
भारताची संभावित प्लेईंग 11 –
शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिजच्या संघात कोणते शिलेदार ?
काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरन हेटमायर, रोवमैन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील हुसेन, अल्जारी जोसेफ आणि ओबेद मैकॉय.
[ad_2]