( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 9 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी वडिलांच्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून शिक्षण घेण्याची संधीही मिळेल.
वृषभ (Taurus)
आज तुमच्या दिवसाची सुरुवात थोडी दमछाक करणारी असेल. तुम्ही तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करू शकता.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी नकळत तुमच्या वृत्तीमुळे कोणाच्या तरी भावना दुखावू शकतात. संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल तर तुम्ही या वेळेचा उपयोग चांगल्या कामासाठी करा.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी यापूर्वी केलेली गुंतवणूक पूर्ण लाभदायक ठरेल. तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवू शकता. प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित काम तुमची जागरूकता वाढवेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. आज झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळणार नाही
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी वरिष्ठांशी बोलताना आपल्या बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात चांगली बातमी मिळू शकते. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. व्यवसायात घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी पैशांशी संबंधित कोणताही व्यवहार ठरवताना सल्ला घ्यावा. कोणत्या तरी ठिकाणी तुमचे पैसे अडकू शकतात.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा. पैशांच्या जास्त खर्चामुळे तुमच्यावर ताणही येऊ शकतो. अनावश्यक वादात पडू नका.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )