देहूनगरी मध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते

संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी देहूनगरीत होणार दाखल.

देहू ।प्रगत भारत|-संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुण्यनगरी देहू मध्ये १४ जून रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते व्हावं. यासाठी पुण्यातील देहू देवस्थानाच्या विश्वस्तांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल असं म्हणत होकार दिला होता. दरम्यान याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला देहू मध्ये येणार आहेत. तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देहू संस्थानाकडून मंदिर सजावटीसाठी तय्यारी सुरु झाली आहे.

Related posts