[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
WTC Final 2023 : टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship 2023) सज्ज झाली आहे. विराट कोहलीसह भारतीय क्रिकेट संघाची पहिली तुकडी आज इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय संघ तीन तुकड्यांमध्ये इंग्लंडमध्ये पोहोचणार आहे.
‘किंग कोहली’ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सज्ज
आज एकीकडे सध्या आयपीएल 2023 च्या क्वालिफायर सामन्यांना सुरुवात होत असून दुसरीकडे टीम इंडियाची पहिली तुकडी टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी इंग्लंडकडे आगेकूच करणार आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमातील (IPL2023) प्लेऑफमध्ये न पोहोचलेल्या संघांपैकी वर्ल्ड चॅम्पियनशीप संघातील सदस्यांची पहिली तुकडी आज (23 मे रोजी) इंग्लंडला रवाना होईल. यामध्ये विराट कोहली सोबत रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हे प्रमुख खेळाडू असतील.
टीम इंडियाची पहिली बॅच इंग्लंडसाठी रवाना होणार
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी आज इंग्लंडला रवाना होणार आहे. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु (RCB) संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्यामुळे आता विराट कोहली देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम सामन्याच्या तयारीसाठी पहिल्या तुकडीसोबत इंग्लंड रवाना होणार आहे. या तुकडीमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचाही समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ एकूण दोन किंवा तीन बॅचमध्ये इंग्लंडसाठी रवाना होईल.
जयदेव उनाडकटही इंग्लंडला रवाना होणार आहे
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नेटमध्ये सराव करताना वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला दुखापत झाली होती. उडानकडही पहिल्या तुकडीसह इंग्लंडला रवाना होणार आहे. उनाडकट अद्याप खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लंडनमध्ये त्याच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवणार असून त्यानुसार उनाडकटच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
IND vs AUS Squad for WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी दोन्ही संघ
Team India : टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहमद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)
Team Australia : टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
[ad_2]