Cristiano Ronaldo Tops Instagram’s Rich List Third Consecutive Year Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Who is the highest paid person on Instagram 2023, Cristiano Ronaldo Instagram one Post Earning: प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. एका इन्स्टा पोस्टवरून तो जवळपास 26 कोटी कमावतो. रोनाल्डोनं आतापर्यंत पाच वेळा फुटबॉल ‘बॅलन डी’ओर’ हा प्रतिष्ठेचा खिताब पटकावला आहे. रोनाल्डो सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर या यादीत विराट कोहली आणि भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा या दोघांचाही समावेश आहे.

यापूर्वी जुलैमध्ये सौदी अरेबियाला गेल्यानंतर 2017 नंतर प्रथमच फोर्ब्सनं रोनाल्डोला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलं होतं. आता रोनाल्डो 2023 च्या इंस्टाग्राम रिच लिस्टमध्ये टॉपवर आहे. 

ही यादी इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल हॉपर हेडक्वार्टरनं संकलित केली आहे. जी इंटरनल (अंतर्गत) आणि सार्वजनिक (पब्लिकली) उपलब्ध डेटाच्या आधारे तयार केली गेली आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक युजर Instagram आणि YouTube वर पोस्टसाठी किती शुल्क आकारतो, याची माहिती देण्यात आली आहे.  

[ad_2]

Related posts