Shakib Al Hasan To Lead Bangldesh Team in Upcoming Asia Cup and World Cup 2023; आशिया चषकापूर्वी या संघाने कर्णधारच बदलला, आता तिन्ही फॉरमॅट एकच कॅप्टन असणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आशिया कप २०२३ च्या आधी बांगलादेशला एक नवा एकदिवसीय कर्णधार मिळाला आहे. शाकिब अल हसनची बांगलादेशच्या वनडे कर्णधारपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. तो आशिया कप आणि विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी तमीम इक्बालने राजीनामा दिल्यानंतर शकीब आता तिन्ही फॉरमॅटवर एकहाती सत्ता गाजवेल. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून त्याचा हा तिसरा कार्यकाळ असेल.

शाकिबने बांगलादेशसाठी महत्त्वाच्या वेळी पदभार स्वीकारला आहे. आशिया चषकानंतर सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात वनडे मालिका होणार आहे. त्याआधी ते ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाणार आहेत. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी ढाका येथील निवासस्थानी ही घोषणा केली. त्यांनी सांगितले, “शकिब अल हसन आशिया कप, न्यूझीलंड मालिका आणि विश्वचषकासाठी संघाचा कर्णधार आहे.”

ते पुढे म्हणाले – तो बांगलादेशमध्ये परतल्यावर (लंका प्रीमियर लीगमधून) आम्ही त्याच्याशी अधिक बोलू. मी काल त्याच्याशी फोनवर बोललो, पण आपण त्याच्याशी प्रत्यक्ष बोललो तर बरे होईल. तो सध्या फ्रँचायझी लीगमध्ये व्यस्त आहे. तो कोणत्या फॉरमॅटमध्ये नेतृत्व करत राहिल याबद्दलही बोलू. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार होऊ शकतो.

टीम इंडियात कोणाचीही जागा निश्चित नाही… रोहितच्या वक्तव्याने सूर्या, विराट आणि जडेजाचही टेन्शन वाढलं
हसन पुढे म्हणाले की, आशिया चषक संघ विश्वचषक संघासारखा असेल. ते म्हणाले – त्यांच्याकडे फक्त एकच जागा रिक्त आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरत असलेल्या तमीम इक्बालबद्दल आम्हाला अजूनही माहिती नाही. शाकिब सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये बांगलादेशचा कर्णधार आहे. त्याने गेल्या वर्षी कसोटी कर्णधार आणि टी-२० कर्णधार म्हणून तिसऱ्यांदा सुरुवात केली.

शाकिबने २००९ ते २०११ दरम्यान बांगलादेशचे ४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले, त्यापैकी २२ सामने जिंकले. शाकिबने नंतर २०१५ आणि २०१७ मध्ये आणखी ३ एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले. शकीबने आतापर्यंत १९ कसोटी आणि ३९ टी-२० सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केले आहे आणि कर्णधार म्हणून ५२ एकदिवसीय सामन्यांपैकी शेवटचा सामना २०१७ मध्ये होता.

[ad_2]

Related posts