( प्रगत भारत । pragatbharat.com)
Surya Mangal Yuti : ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो. दरम्यान यावेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असताना दोन ग्रहांची युती होते. येत्या 17 ऑगस्ट 2023 सूर्य देव गोचर करणार आहे. यावेळी सूर्य देवांची युती मंगळ ग्रहासोबत होणार आहे.
सूर्यदेव तब्बल 1 वर्षानंतर सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याचं राशी बदलून सिंह राशीत प्रवेश केल्याने मोठा बदल दिसून येणार आहे. यावेळी ग्रहांचा सेनापती मंगळ आधीच सिंह राशीमध्ये आहे. दरम्यान सूर्याच्या या गोचरमुळे सिंह राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. सिंह राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव पाडणार आहे. जाणून घेऊया सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.
सिंह रास
सिंह राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी ही युती खूप शुभ ठरणार आहे. सिंह राशीत सूर्याच्या गोचरमुळे निर्माण झालेली ही युती या राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळवून देऊ शकते. व्यापारात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळेल. तुम्हाला अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या बळावर अनेक कामं पार पाडाल.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाचा संयोग शुभ परिणाम देणार आहे. या लोकांचे उत्पन्न वाढण्याची पूर्ण शक्यता आहे. यावेळी उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होणार आहेत. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होणार आहे. तुमची कोणतीही महत्त्वाची योजना यशस्वी झाल्यास तुम्ही आनंदी व्हाल. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाचा संयोग अनुकूल परिणाम देणारा ठरणार आहे. या लोकांना त्यांच्या कामात नशिबाची साथ मिळू शकणार आहे. तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक आनंदावर सकारात्मक प्रभाव पडेल. अचानक तुमची धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. तुम्ही करत असलेला प्रवास लाभदायक ठरू शकतो. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. बेरोजगार लोकांना या काळात नोकरी मिळू शकते.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )