[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आज भारताचा संघ मुंबईहून रवाना झाला. यावेळी महाराष्ट्राचा धडाकेबाज खेळाडू ऋतुराज सर्वांना दिसला. ऋतुराजबरोबर महाराष्ट्राच्या अमरावतीचा एक खेळाडू भारतीत संघात पाहायला मिळाला. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्याचबरोबर भारतामधील स्थानिक स्पर्धांमध्ये त्याने दमदमार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची यावर्षी जोरदार चर्चा सुरु झाली होती. भारतासाठी हा खेळाडू महत्वाचा आहे. कारण तो दुहेरी भूमिका बजावू शकतो. तो धमाकेदार फटकेबाजी तर करतोच पण त्याचबरोबर तो एक चांगला यष्टीरक्षकही आहे. त्यामुळे भारतासाठी त्याची निवड महत्वाची समजली जात आहे. तो खेळोडू आहे अमरावतीचा जितेश शर्मा. जितेशला आता जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात आयर्लंडच्या दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे.
आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, शाहबाज अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, रवी बिश्नोई .
भारत आणि आयर्लंडच्या टी-२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना – १८ ऑगस्ट, मालाहाइड
दुसरा टी-२० सामना – २० ऑगस्ट, मालाहाइड
तिसरा टी-२० सामना – २३ ऑगस्ट, मालाहाइड.
भारतासाठी हा दौरा महत्वाचा असेल. कारण बरेच युवा खेळाडू या संघात आहेत. रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी आयपीएल २०२३ मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. हे दोन्ही खेळाडू त्यांच्या धारदार फलंदाजीसाठी ओळखले जातात. रिंकू सिंगने मॅच फिनिशर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे जितेशनेही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे आता या दौऱ्यात जितेशकडून कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
[ad_2]