[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
चेन्नई : महेंद्रसिंग धोनीला गुजरातविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकता आला नव्हता. पण धोनीने चेन्नईला सामना मात्र जिंकून दिली. त्यामुळे आता चेन्नईचा संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर आता धोनीचा फायनलमध्ये पोहोचण्याचा गेम प्लॅन नेमका काय होता, हे आता समोर आले आहे.धोनी हा किती चाणाक्ष कर्णधार आहे, हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. कारण टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही कर्णधाराने टॉस जिंकला तर तो प्रथम गोलंदाजी करतो. त्यामुळे टॉसला बॉसही म्हटले जाते. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेतला. त्यामुळे आता हा सामना गुजरात जिंकणार, असे वाटत होते. पण धोनीला टॉस गमावल्याचे टेंशन नव्हते. कारण धोनीच्या डोक्यात विजयाचा गेम प्लॅन यापूर्वीच तयार होता.
या सामन्यापूर्वी धोनी म्हणाला होता की, ” चेन्नईची खेळपट्टी ही संथ होत जात आहे. कारण बरेच सामने या मैदानात झाले आहेत आणि उन्हाळाही जास्त आहे. त्यामुळे ही खेळपट्टी आता संथ होत जाणारी आहे. त्यामुळे या खेळपट्टी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना चेंडू संथपणे बॅटवर येईल. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करणे सोपे नसेल. दुसऱ्यांदा फलंदाजी करताना दवाचा थोडा फायदा फलंदाजी करताना होऊ शकतो. पण चेंडू संथपणे बॅटवर येत असेल तर त्यावेळी फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्वाची ठरते. आमच्याकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. त्यामुळे या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा आमचा मानस असेल. प्रथम फलंदाजी करून जर १८० धावा करता आल्या तर ही धावसंख्या विजयासमीप नेऊन जाणारी ठरू शकते. त्यामुळे चेन्नईच्या मैदानात जो संघ टॉस जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.” हीच गोष्ट आजच्या सामन्यात पाहायला मिळाली. कारण ऋतुराजच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईच्या संघाला १७२ धावा करता आल्या. त्यानंतर चेन्नईच्या रवींद्र जडेजा आणि महेश तीक्ष्णा या दोन्ही फिरकीपटूंना यावेळी धोनीने सांगितल्यासारखी गोलंदाजी केली. या दोघांनी चार विकेट्स घेत गुजरातचे कंबरडे मोडले आणि धोनीच्या गेम प्लॅननुसार चेन्नईने सामना जिंकला.

धोनीने यावेळी खेळपट्टीचा चांगलाच अभ्यास केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नईच्या संघाला हा विजय मिळवता आला. त्यामुळे आता चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. चेन्नईच्या संघाने आपल्या घरच्या मैदानात दमदार विजय साकारला आणि आता ते फायनल खेळण्यासाठी गुजरातला जाणार आहेत.
[ad_2]