IND Vs IRE 1st T20 Live Updates India playing against Ireland match highlights Malahide Cricket Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND Vs IRE Live Score :  भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) टी20 मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. आजपासून भारत आणि आयर्लंड  यांच्यातील टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाच्या (Team India) सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारताचे कोणते शिलेदार मैदानात उतरणार ? याकडे लक्ष लागलेय. 

युवा खेळाडूंना संधी – 

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.

भारताच्या सिनिअर खेळाडूंना आराम –

18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.

रिंकू सिंहला पदार्पणाची संधी मिळणार?

टीम इंडियाने आयर्लंड दौऱ्यासाठी रिंकू सिंहला संधी दिली आहे. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. रिंकूने सोशल मीडियावर टीम इंडियाच्या जर्सीमधील फोटो शेअर केले आहेत. टीम इंडियासोबतच्या सरावादरम्यानचे हे फोटो आहेत. रिंकूने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, यामध्ये तो टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसत आहे आणि त्याच्या हातामध्ये बॅट आहे.

कुठे पाहणार लाईव्ह ? 

भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्याची मालिका भारतात सपोर्ट्स 18 येथे लाईव्ह पाहता येतील. तर जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाईटकवरही सामन्यांचा आनंद घेता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यांसंदर्भात अपडेट मिळेल.  

कधी सुरु होणार सामना ?

भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल. 

भारत आणि आयर्लंड मालिका

भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि आयर्लंड टी-20 मालिका शुक्रवारपासून सुरु होत आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी20 सामना रंगणार आहे. 

दोन्ही संघाचे शिलेदार कोण कोण ?

भारत : 

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड : 

पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग. 

 

[ad_2]

Related posts