विविध उपक्रमाद्वारे नाना काटे यांचा वाढदिवस साजरा संलग्न: शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची दिवसभर मांदियाळी

चिंचवड, १६ ऑगस्ट: माजी विरोधी पक्षनेते व युवा नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पिंपळे सौदागर येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर दिवसभर मोठी गर्दी केली होती.

   खासदार श्रीरंगआप्पा बारणे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, कविता अल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, शाम लांडे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, पंकज भालेकर, निलेश डोके, राहुल भोसले, विक्रांत लांडे, संतोष कोकणे, विनोद नढे, संजय वाबळे, प्रभाकर वाघेरे, समीर मासुळकर, सुलक्षणा शीलवंत, माई काटे, माई काळे, प्रज्ञा खानोलकर, खंडूशेठ कोकणे, प्रसाद शेट्टी, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप संग्राम महाराज भंडारे, हभप लक्ष्मण महाराज जगताप (आळंदी) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो नागरिकांनी नाना काटे यांना शुभेच्छा दिल्या.  

  नाना काटे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली आठवडाभरापासून शहरात विशेषतः चिंचवड मतदार संघात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, वृक्षारोपण व वृक्षवाटप, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार, रुग्णवाहिका लोकार्पण, फळे वाटप, जेष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम यांसारखे विविध समाजउपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये यावर्षी प्रामुख्याने आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिरावर भर देण्यात आला होता. सांगवीतील शिबिरात ५३३ जणांचे रक्तदान आणि ६३० जणांची आरोग्य तपासणी, रहाटणीतील शिबिरात ७६७ जणांचे रक्तदान तर १४६२ लोकांची आरोग्य तपासणी, वाल्हेकरवाडीतील शिबिरात १०८३ जणांचे रक्तदान व १४६२ नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच काळेवाडीत ३१२ जणांचे रक्तदान असे एकूण सर्व शिबिरात २६९५ नागरिकांनी रक्तदान केले आणि ३२५६ जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिरासाठी डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, संजीवनी ब्लड बँक, जनसेवा ब्लड बँक, रेड प्लस बॅक, या संस्थेंचे डॉक्टर आणि त्यांची टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.

चौकट….

अजित दादांचा फोन…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अचानकपणे महत्वाच्या बैठकीसाठी मुंबई येथे जावे लागल्याने अत्यंत व्यस्त शेडोल असतानाही न विसरता दादांनी आवर्जून नाना काटे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कॉंग्रेसचे मा.प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, आमदार शशिकांत शिंदे, मंत्री अदितीताई तटकरे, युवा नेते पार्थ दादा पवार, आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार निलेश लंके, मा. आमदार विलास लांडे, मा. आमदार गौतम चाबुकस्वार, मा. आमदार रमेश अप्पा थोरात यांच्यासह राज्यातील आजी माजी आमदार व दिग्गज नेते मंडळीनी काटे यांना फोनवर शुभेच्छा दिल्या.

…………………………………………..

चौकट…..

कार्यतत्पर राहण्यास उर्जा मिळाली…..

वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी अमूल्य आहेत. म्हणूनच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमचा विश्वास सदैव माझ्यावर असावा, यामुळे कार्यतत्पर राहण्यास मला ऊर्जा मिळते. आपल्या सदैव ऋणात मी असणार आहे.

-नाना काटे, मा. विरोधी पक्षनेते

Related posts