[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : फेसबुकची (Facebook) पॅरेंट कंपनी मेटाने (Meta) एक नवं फिचर लवकरच सुरु करणार आहेत. व्हॉइस-टू-टेक्स्ट असं हे फिचर असून यामध्ये जवळपास 100 भाषांचे भाषांतर करण्यात येणार आहे. SeamlessM4T असं या मेटाच्या नव्या फिचरचं नाव असणार आहे. तसेच युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सुरु करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आल्याचं देखील यानिमित्ताने म्हटलं जात आहे.
SeamlessM4T हे फिचर मोठ्या प्रमाणात अनेक भाषांचे अगदी सोप्या भाषांतर करण्यास सक्षम असणार आहे. यामध्ये केवळ भाषांतरच होणार नाही तर त्याचे टेक्स्टमध्ये रुपांतर देखील होणार आहे. व्हॉइस-टू-व्हॉइस आणि टेक्स्ट-टू-व्हॉइस अशा दोन प्रक्रिया या फिचरमध्ये असणार आहेत. असं फिचर सुरु करणं हे सुरुवातील थोडं आव्हानात्मक होतं कारण सर्व भाषांमध्ये याचं अनुवाद करायचं होतं, असं मेटाकडून सांगण्यात आलं आहे.
कालांतराने व्याप्ती वाढवणार
दरम्यास सुरुवातीच्या काळामध्ये व्हॉइस-टू-व्हॉइस आणि व्हॉइस-टू-टेक्स्ट हे फिचर काही भाषांकरताच मर्यादित असणार आहे, त्यानंतर या फिचरची व्याप्ती वाढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान SeamlessM4T हे मेटासाठी प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. हे फिचर एकचा वेळी संपूर्ण भाषांतर करण्यास सक्षम असणार आहे. त्यामुळे युजर्सना आता एका व्हॉइसमध्ये त्यांचे संपूर्ण भाषांतर टेक्स्टच्या स्वरुपात देखील उपलब्ध होणार आहे.
‘हे’ आहे खास वैशिष्ट्य
या फिचरचं एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे जर तुम्ही एका व्हॉइसमध्ये अनेक भाषा वापरत असाल तर त्या ओळखून त्याचं भाषातंर देखील हे फिचर करणार आहे. म्हणजेच जर तुम्ही मराठीमध्ये व्हॉइस भाषांतरासाठी करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही काही इंग्रजी शब्द वापरले तर त्याचेही भाषांतर हे फिचर करणार आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक भाषांचं भाषांतर या फिचरच्या माध्यमातून होणार आहे. तसेच एखाद्या भाषेतील भाषणाचे भाषांतर करण्यास देखील मेटाचे हे फिचर तुमची मदत करणार आहे.
मेटाने त्यांचा हा प्रयोग चीनमधील एका भाषेसाठी केला होता. पण त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर होताना त्यामध्ये अनेक व्याकरणाच्या त्रुटी निर्माण होत होत्या. त्यावर देखील मेटाने काम सुरु केले आणि आता 100 भाषांमध्ये ही सेवा लवकरच सुरु होणार आहे. सध्या AI जगातील अनेक भाषांमधील शब्दांचे अर्थ लावणे हे सहज सोपं झालं आहे. तसेच फेसबुक सारख्या कंपन्यांना संपूर्ण जगातील भाषांमध्ये व्यवहार करावा लागतो. त्यांच्यासाठी AI आणि युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सारख्या फिचर्समुळे काम करणं सोपं झालं आहे.
हेही वाचा :
Instagram Threads Update : Threads चं वेब व्हर्जन लवकरच सुरु होणार; यूजर्सना मिळतील ‘या’ सुविधा
[ad_2]