[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
इस्लामाबाद: भारताच्या चांद्रयान-३ नं यशस्वी लँडिंग करत इतिहास रचला. चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा भारत चौथा देश ठरला आहे. याआधी अमेरिका, चीन आणि रशियाला ही कामगिरी करता आली आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. २०१९ मध्ये भारताची चांद्रयान मोहीम थोडक्यात हुकली. मात्र गेल्या वेळी झालेल्या चुका टाळत यावेळी इस्रोनं इतिहास घडवला.
देशाच्या कानाकोपऱ्यातून चांद्रयान-३च्या यशासाठी प्रार्थना झाल्या. होमहवन, नमाज करण्यात आले. भारताची मोहीम यशस्वी होताच देशभरात जल्लोष साजरा झाला. जगभरातील अनेक देशांनी भारताचं अभिनंदन केलं. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरताच पाकिस्तानच्या नागरिकांनी आपल्याच सरकारला झोडपून काढायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यानं मिश्किलपणे आपल्याच देशाची खिल्ली उडवली आहे.

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर एका पाकिस्तानी यूट्यूबरनं नागरिकांशी संवाद साधला. आपण चंद्रावर केव्हा पोहोचणार, असा प्रश्न त्यानं एका तरुणाला विचारला. त्यावर त्यानं भन्नाट उत्तर दिलं. ‘ते तर पैसे खर्च करुन जात आहेत ना. आपण तर आधीपासूनच चंद्रावर राहतोय,’ असं तरुण म्हणाला.
आपण कसे काय चंद्रावर राहतोय, असा प्रतिप्रश्न यूट्यूबरनं तरुणाला केला. त्यानंतर तरुणानं मिश्किल अंदाजात त्याचं लॉजिक सांगितलं. ‘चंद्रावर पाणी नाही, इथेही पाणी नाही. चंद्रावर गॅस नाही, इथेही गॅस नाही. तिथे वीज नाही, इथेदेखील नाही,’ असं तरुणानं म्हटलं. पाकिस्तानी नागरिकांच्या समस्यांना चंद्राशी जोडत त्यांन अत्यंत उपरोधिकपणे स्वत:च्याच देशाचे वाभाडे काढले. या तरुणाच्या विनोदबुद्धीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.
[ad_2]