K. Srikanth Got Angry On The Selection Committee After Unfit K L Rahul Get Chance In Indian Team For Asia Cup 2023 ; K L Rahul ला वर्ल्ड कपमध्ये घ्यायचं तर घ्या पण… निवड समितीवर श्रीकांत का भडकले जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला जोरदार चर्चा आहे ती के. एल. राहुलची. कारण तो पूर्णपणे फिट नाही आणि तरीही त्याला आशिया चषकाच्या संघात स्थान दिले आहे. आता भारताचे विश्वविजेते खेळाडू के. श्रीकांत निवड समितीवर चांगलेच भडकले आहेत. रागाच्या भरात त्यांनी आता वर्ल्ड कपबाबतही विधान केलं आहे.

श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “केएल राहुलला काही समस्या आहे, असे म्हटले जात आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर त्याला संघात निवडू नका. जर एखादा खेळाडू निवडीदरम्यान फिट नसेल तर तुम्ही त्याला निवडू नये. हेच आमचे धोरण होते. निवडीच्या दिवशी एखादा खेळाडू तंदुरुस्त नसेल तर त्याला निवडू नका. तुम्हाला त्याला विश्वचषकासाठी निवडायचे असेल तर त्याला विश्वचषकासाठी निवडा. हा वेगळा मुद्दा आहे. आता ते म्हणतात. आम्हाला खात्री आहे की तो काही वेळाने खेळू शकेल. म्हणूनच आम्ही संजू सॅमसनची ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून निवड केली आहे. हे काय आहे? तुम्ही आशिया चषकासारखी स्पर्धा खेळणार आहात. निवडकर्ते संभ्रमात आहेत. तुम्ही गेल्या दोन हंगामात अंतिम फेरीत पोहोचला नाही. तुम्हाला अंतिम फेरी गाठायची असेल, तर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.”

दुखापतीमुळे राहुलला आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले. त्यानंतर अनेक मालिकांचा भाग तो राहिलेला नाही. मात्र, इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचे एनसीएमध्ये पुनर्वसन सुरु होते, जिथे त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याला दुखापत झाल्याचे म्हटले गेले. त्यामुळे ही दुखापत लवकर बरी होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याची निवड आशिया चषकासाठी करण्यात आल्याचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले होते. पण जर एखादा खेळाडू फिट नसेल तर त्याला संघात का स्थान द्यावे, हा श्रीकांत यांचा प्रश्न रास्त आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

त्यामुळे आता राहुल लवकर फिट होऊन आशिया चषकात खेळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

[ad_2]

Related posts