Elon Musks X Introduces Job Listing Feature For Verified Users Know In Detail About These New Feature Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Elon Musk’s Introduces Job Listing Feature : एलॉन मस्कने (Elon Musk) ट्विटर विकत घेतल्यापासून, प्लॅटफॉर्ममध्ये सतत बदल होत आहेत. एलॉन मस्कने ट्विटरचे स्वरुप बदलले आहे. यूजर्ससाठी एलॉन मस्क कायमच नवनवीन अपडेट करत असतात. आता पुन्हा एकदा एलॉन मस्क ट्विटरमध्ये एक भन्नाट फिचर सुरु करणार आहेत. आता लवकरच LinkedIn प्रमाणे ट्विटर देखील नोकरी शोधता येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, X हँडलवर युजर्ससाठी जॉब सर्चचे फीचर सुरु केले जात आहे. एक्स हॅण्डलवर जॉब सर्च फीचर आणण्याचा इशाराही एलॉन मस्ककडून मिळाला आहे. लवकरच या प्लॅटफॉर्मवर नोकऱ्या शोधण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. एलॉन मस्कच्या AI कंपनीने @XHiring वर जॉब लिस्ट पोस्ट करणे सुरु केले आहे. तथापि, ते सध्या वेबवर उपलब्ध आहे आणि केवळ यूएससाठी व्हिजिबल आहे. गेल्या महिन्यात, निमा ओवजी नावाच्या अॅप संशोधकाने जॉब लिस्टिंग फीचरसंदर्भात एक स्क्रीनशॉट शेअर केला. X हँडल ट्विटर हायरिंगच्या नावाने हे फीचर देत असल्याचे या स्क्रीनशॉटवरुन उघड झाले. कंपनीकडून हे मोफत फीचर असल्याचे सांगण्यात आले आहे. 

X Premium New Features काय आहे?

पेड यूजर्स आता X वर 3 तासांपर्यंतचे मोठे व्हिडीओ अपलोड करु शकतात. यूजर्स 1080p मध्ये 2 तासांपर्यंत आणि 720p मध्ये 3 तासांपर्यंत व्हिडीओ पोस्ट करु शकतात. याशिवाय यूजर्स आपल्या टाईमलाईनमध्ये येणारे व्हिडीओ गॅलरीमध्ये सेव्ह देखील करु शकतात. यासाठी त्यांना डाऊनलोडचा पर्याय मिळेल. जर पेड यूजर्सना असे वाटत असेल की, त्यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ कोणीही डाऊनलोड करु शकत नाही, तर यासाठी त्यांना व्हिडीओचा डाऊनलोड पर्याय डिसेबल किंवा अनेबल करण्याचा पर्याय असेल. याशिवाय एलॉन मस्क यांनी सशुल्क यूजर्सना एअरप्लेची सुविधा दिली आहे. याअंतर्गत यूजर्स स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीओही प्ले करु शकतात. हे फीचर लांबलचक व्हिडीओ पाहण्यासाठी फायदेशीर आहे. X प्रीमियम यूजर्सना लोकप्रिय व्हिडीओंसाठी पिक्चर-इन-पिक्चर आणि ऑटो कॅप्शनसाठी समर्थन देखील मिळेल. याबरोबरच लाईव्हची व्हिडीओ क्वॉलिटीही यापूर्वी करण्यात आली आहे. मस्क यांनी अँड्रॉइड आणि आयओएस यूजर्ससाठी इमर्सिव्ह व्हिडीओ प्लेअरचे समर्थन केले आहे. 

अशा पद्धतीने होणार X (Twitter) व्हेरिफिकेशन

आता ट्विटरवर व्हेरिफिकेशन करणं अधिक सोप होणार आहे. याकरता तुम्हाला आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट हे डाॅक्युमेंट्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात. ट्विटरने याबाबत  कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच ही सुविधा येणार असं सांगण्यात येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

AI Voice Clone Fraud : AI च्या मदतीने ओळखीच्या व्यक्तींचा आवाज काढून फसवणूक, स्कॅम टाळण्यासाठी काय करावे?

[ad_2]

Related posts