Virat And Naveen Ul Haq Will No Face Each Other In Asia Cup 2023 As Naveen Is Not In Afghanistan S Squad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli Vs Naveen Ul Haq : आगामी आशिया चषकासाठी आफगाणिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 सदस्यीय संघामध्ये वेगवान गोलंदाज नवीन उल हक याला स्थान मिळाले नाही. आयपीएलमध्ये लखनौ संघाचे प्रतिनिधित्व करणारा नवीन आशिया चषकात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे विराट कोहली आणि नवीन यांचा सामना पाहायला मिळणार आहे. 2023 आयपीएल स्पर्धेत विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. दोघांमधील हा वाद आजही चर्चेत होता. आशिया चषकात दोघांमध्ये पुन्हा सामना होईल, अशी चाहत्यांना आपेक्षा होती. पण आफगाणिस्तानच्या संघात नवीन उल हक याला स्थान मिळाले नाही. 

आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन यांच्यात वाद झाला होता. त्यामध्ये गौतम गंभीर याने उडी घेतल्याने हा वाद आणखी वाढला होता. सोशल मीडियावरही दोन्ही खेळाडूमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. दोघांनीही नाव न घेता टीका केली होती.  त्याशिवाय विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु होते. त्यामुळे आशिया चषकात दोघांमधील सामना चाहत्यांना पाहायला आवडला असता, पण नवीन याची संघात निवडच झाली नाही. त्यामुळे काही चाहत्यांमध्ये निराशाचे वातावरण आहे. आफगाणिस्तानच्या संघाने नवीन उल हक याचा पत्ता कट केला. 

पाकिस्तान आणि आफगाणिस्तान यांच्यात नुकतीच वनडे मालिका पार पडली. त्यानंतर आशिया चषकासाठी आफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आलाय. फरीद अहमद, अजमतुल्लाह उमरजई, शहीदुल्लाह कमाल आणि वफादार मोमंद यांना संघात स्थान मिळवण्यात अपयश आलेय.  हे खेळाडू पाकिस्तानविरोधात आफगाणिस्तान संघाचा भाग होते. 

आशिया चषकासाठी आफगाणिस्तानच्या संघात कोण कोणते शिलेदार? 

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, राशिद खान, गुलबदीन नैब, करीम जनत, अब्दुल रहमान, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, नूर अहमद, सुलिमान सफी, फजलहक फारूकी. 

कधीपासून आशिया चषक ?

आशिया चषकाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाचा शुभारंभ होईल. यंदाचा आशिया चषक वनडे फॉर्मेटमध्ये हायब्रिड मॉडेलनुसार होणार आहे. भारताचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे.  सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अ ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा समावेश आहे. तर ब गटामध्ये बांगलादेश, आफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ असतील. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 13 सामन्यानंतर आशियाचा किंग कोण यावरुन पडदा उठेल. 

 

[ad_2]

Related posts