[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asia Cup 2023 : पाकिस्तानमधील मुल्तान येथे आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सलामीचा सामना झालाय. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. श्रीलंका संघाला मायदेशात होणाऱ्या सामन्याचा फायदा होणारआहे. श्रीलंकेचा पहिला सामना बांगलादेशविरोधात 31 ऑगस्ट रोजी पल्लेकल येथे होणार आहे. श्रीलंका संघाने आशिया चषकासाठी निवडलेल्या संघामध्ये दोन भेदक गोलंदाजांना निवडलेय. हे दोन्ही गोलंदाज आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचा भाग आहेत. महिश तिक्षणा आणि मथिशा पाथिराणा आयपीएलमध्ये चन्नईच्या संघाचा भाग आहेत. धोनीने तयार केलेल्या या दोन गोलंदाज श्रीलंकेसाठी महत्वाची भूमिका बजावतील. धोनीच्या शाळेत तयार झालेले हे गोलंदाज भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतील, असा अंदाज वर्तवला जातोय.
महिश तिक्षणा आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचा भाग आहे. पदार्पणाच्या मोसमात त्याने 9 सामन्यात 12 विकेट घेतल्या. कर्णधार धोनीने तीक्षाणावर खूप विश्वास व्यक्त केला होता आणि स्पर्धेदरम्यान खूप मदतही केली होती. तिक्षणाने आयपीएल 2023 मध्येही धोकादायक गोलंदाजी केली होती. आता तो आशिया कपमध्ये श्रीलंकेकडून खेळणार आहे. धोनीने मथिशा पाथिराणावरही विश्वास दाखवला होता. त्याला सतत संधी दिली आणि त्याच्याधील टॅलेंट विकसित करण्यात खूप मदत केली. 2022 मध्ये पाथीराणा याला केवळ दोन आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने दोन विकेट्स घेतल्या. पण पुढच्या मोसमात 12 सामने खेळले. आयपीएल 2023 च्या 12 सामन्यात पाथीरानाने 19 विकेट घेतल्या. तो धोनीच्या महत्त्वाच्या गोलंदाजांपैकी एक ठरला. आता तो आशिया कपमध्ये श्रीलंकेकडून खेळण्यासाठीही सज्ज झाला आहे.
आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेसाठी पाथीराणा आणि तीक्षाणा महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. हे दोघेही भारताविरुद्ध प्रभावी कामगिरी करु शकतात. साखळी फेरीनंतर सुपर 4 च्या सामन्यावेळी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि श्रीलंका वेगवेगळ्या गटामध्ये आहेत. त्यामुळे सुपर 4 सामन्यात श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये लढत होणार आहे. भारताविरोधात हे दोन्ही खेळाडू प्लेईंग 11 चा भाग असतील. त्या सामन्यात हे गोलंदाज भारतीय फलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकतात.
हायब्रिड मॉडेलनुसार आशिया चषक –
यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण भारताने पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्यास नकार दिला. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाईल, असे निश्चित झाले. याअंतर्गत मुल्तान आणि लाहोर येथे आशिया चषकाचे 4 सामने खेळले जातील, तर श्रीलंकेत 9 सामने होतील.
सहा संघ, स्पर्धा कशी रंगणार ?
आशिया चषकात एकूण सहा संघ भाग घेत आहेत, त्यांना दोन गटात विभागले आहे. अ गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तान संघांना ठेवण्यात आलेय. तसेच, ब गटात अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यानंतर सुपर 4 फेरीत दोन्ही गटातील अव्वल 2 संघ एन्ट्री करतील. सुपर 4 फेरीत प्रत्येक संघ एकमेकांशी एक वेळा भिडतील. त्यामधील आघाडीचे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.
[ad_2]