[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
बऱ्याच महिन्यांनी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरीक प्रतिस्पर्धी देश एकमेकांसमोर आशिया चषकात उभे ठाकणार होते. हा सामना २ सप्टेंबरला होणार आहे. या सामन्ययाकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले होते. पण या सामन्याची उत्सुकता असणाऱ्या चाहत्यांचा आता हिरमोड होणार असल्याचे समोर आले आहे. आशिया चषकातील दोन सामने तर निर्विघ्नपणे पार पाडले. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना मात्र रद्द होणार असल्याचे समोर येत आहे.
आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील लढती श्रीलंकेत घेतल्यास स्पर्धेत पावसाचा चांगलाच व्यत्यय येईल, अशी भीती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली होती. आता तेच खरे ठरण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या दिवशी वादळी वाऱ्यांसह पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ‘वेदर डॉट कॉम’ संकेतस्थळाने सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता ९० टक्के असल्याचे म्हटले आहे, तर ‘गुगल वेदर’नेही हीच शक्यता वर्तवली आहे. सामन्याच्या दिवशी आर्द्रता ८४ टक्के असेल, तर तापमान २८ अंश. ‘अॅक्यूवेदर’नुसार पावसाची शक्यता ९४ टक्के आहे. भारतीय क्रिकेट संघ बुधवारी श्रीलंकेत दाखल झाला. भारताची स्पर्धेतील लढत शनिवारी, दोन सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध आहे. त्यामुळे या दिवशी श्रीलंकेत जोरदार पाऊस पडणार आहे. ९० टक्के पावसाची शक्यता म्हटली गेली आहे, म्हणजे या सामन्यात सर्वात जास्त व्यत्यय हा पावसाचाच येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जर ९० टक्के पाऊस पडणार असेल तर हा सामना होऊ शकणार नाही. त्यामुळे पावसामुळे हा सामान रद्द करण्याची नामुष्की आता यजमानांवर येऊ शकते आणि क्रिकेट विश्वात निराशा पसरू शकते. या दिवशी खेळ जरी झाला तरी डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना खेळवला जाऊ शकतो. पण जर ९० टक्के पाऊस पडला तर संपूर्ण सामना होऊ शकणार नाही. त्यामुळे आता २ सप्टेंबरला नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतील.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत. पण आता हा सामना रद्द झाला तर चाहत्यांसाठी ही सर्वात मोठी वाईट बातमी असेल.
[ad_2]