Aditya L1 Mission Lagrange Point And Know Everything About This Mission Of ISRO; आदित्य एल-१ जिथून सूर्याचं परिक्षण करणार तो लग्रांज पॉइंट म्हणजे काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरु: ‘चांद्रयान ३’च्या परिश्रमपूर्वक यशानंतर आता भारतीय अंतराळ सशोधन संस्थेने (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन हे यान येत्या शनिवारी (दोन ऑगस्ट) प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे. या मोहिमांद्वारे चंद्र-सूर्यांना ज्ञानकवेत घेण्याच्या या मोहिमा भारताच्या शिरपेचात मानाचे नवे तुरे रोवणाऱ्या आहेत. भारताच्या सूर्य मोहिमेविषयी…

कसे जाणार आदित्य एल वन?

– ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाद्वारे (पीएसएलव्ही-सी ५७) शनिवारी, दोन ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून आदित्य एल वन प्रक्षेपित केले जाईल.

– हे यान प्रत्यक्ष सौरभूमीवर जाणार नसून, पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील सूर्याच्या कक्षेत जाणार आहे. यानाचे गंतव्य स्थान म्हणून निश्चित केलेल्या बिंदूला लग्रांजियन पॉइंट असे म्हटले जाते.

– या ठिकाणी पोहोचण्यासाठी आदित्य यानाला चार महिने लागणार

– या बिंदूपासून यानावरील उपकरणे सौर किरीट (सोलर करोना) आणि सौर वायूची निरीक्षणे नोंदवणार

भारत सूर्याच्या किती जवळ जाणार, L1 म्हणजे काय? जाणून घ्या इस्रोच्या आदित्य-L1 बाबत सर्व माहिती
‘आदित्य’चा प्रवास कसा होणार?

– चांद्रयानाप्रमाणेच आदित्य यानही सुरुवातीला पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करील.

– त्यानंतर हे यानाच्या परिभ्रमण कक्षा अधिकधिक लंबवर्तुळाकार केल्या जातील.

– यानातील प्रणोदकाच्या साह्याने (प्रॉपल्शन मॉड्यूल) ते एल वन पॉइंटच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल. या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून पलीकडे जाईल.

सौर मोहिमेची उद्दिष्टे

– सौर किरिटाचे तापमान आणि सौर वायूंच्या गतीचा अभ्यास करणे

– सौर किरिटातील वस्तुमान उत्सर्जन, ज्वाला आणि पृथ्वीनजीकच्या वातावरणाचा अभ्यास करणे

– सौर वायूंचे वितरण आणि तापमानातील विषमता यांचा अभ्यास करणे

चांद्रयान-३ चा महत्त्वाचा शोध, दक्षिण ध्रुवावर सल्फर सापडलं, चंद्राच्या जन्माचं रहस्य उलगडणार
लग्रांज पॉइंट म्हणजे काय?

– प्रत्येक ग्रहाजवळ असे काही बिंदू असतात, जेथे त्या ग्रहाची गुरुत्वीय शक्ती, अवकाशयानाची कक्षीय गती आणि सूर्याची गुरुत्वीय शक्ती यांचे संतुलन साधले जाते. त्या ठिकाणी अवकाशयान स्थिर करून सूर्याचा तेथून निरीक्षणे नोंदवणे, अभ्यास करणे शक्य असते. पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान असे पाच बिंदू निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना लग्रांजियन पॉइंट १ ते ५ अशी नावे देण्यात आली आहेत. त्यापैकी एल वन या बिंदूपर्यंत आदित्य यान जाणार आहे. तेथून ते निरीक्षणे नोंदवेल.

आदित्य यानाविषयी…

आदित्य एल वन ही भारताची पहिलीच अवकाशीय प्रयोगशाळा स्वरूपातील मोहीम असणार आहे. आदिय यान एल वन बिंदूजवळील कक्षेत अविरत परिभ्रमण करीत राहील. त्यामुळे त्याला सूर्याचे निरीक्षण कोणत्याही अडथळ्याविना आणि कोणतेही ग्रहण न होता करता येईल. त्यामुळे सूर्यावरील घडामोडी विनाखंड पाहणे शक्य होणार आहे. या यानावर सात उपकरणे असतील. त्यांच्याद्वारे सूर्याचे फोटोस्फीअर, क्रोमोस्फीअर, सौर किरीट यांचा अभ्यास केला जाणार आहे.

‘आदित्य’वरील उपकरणे

– व्हिजिबल एमिशन लाइन करोनाग्राफ (व्हीईएलसी) – सौर किरीट आणि वस्तुमान उत्सर्जन यांचा अभ्यास करणारे उपकरण.

– सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (सूट) – सूर्याचा फोटो स्फीअर आणि क्रोमो स्फीअर येथील अल्ट्रा व्हायोलेट पट्ट्याची निरीक्षणे नोंदवणे आणि या भागातील विकिरणाचे मापन करणारे उपकरण.

– आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपरिमेंट (अपेक्स) आणि प्लाझ्मा ॲनालायझर पॅकेज फॉर आदित्य (पापा) – सौर वायू आणि ऊर्जा प्रभार (आयन) आणि त्यांचे वितरण यांचा अभ्यास करणारे उपकरण.

– सोलर एनर्जी एक्स-रे स्पेक्टोमीटर (सोलेक्स) आणि द हाय एनर्जी एल वन ऑर्बिटिंग एनर्जी स्पेक्ट्रोमीटर (हेलियॉस) – सूर्याकडून उत्सर्जित केले जाणारे क्ष किरण आणि त्यांच्या ऊर्जेतील वैविध्य यांचा अभ्यास करणारे उपकरण.

– मॅग्नोमीटर – एल वन बिंदू नजीक असणाऱ्या आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करणारे उपकरण

चांद्रयान-3, लँडर इमेजर कॅमेर्‍याने सेफ लँडिंगवेळी चंद्राची प्रतिमा कॅप्चर केली

आतापर्यंत सौर मोहिमा आखणारे देश

– १९६० ते १९६९ – अमेरिका – सहापैकी पाच मोहिमा यशस्वी.

– १९७४ – हेलियॉस ए (जर्मनी-अमेरिका, १९७४ ते १९८२)

– १९७६ – हेलियॉस बी (जर्मनी-अमेरिका, १९७६ ते १९८५)

– आयएसईई – अमेरिका १९७८ ते १९८२

पुढील मोहिमा अमेरिकेनेच आखल्या.

[ad_2]

Related posts