[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans : आयपीएलचा सोळावा हंगाम उत्तारार्धाकडे झुकला असून प्लेऑफचे सामने सुरु झाले आहेत. चेन्नईने फायनलध्ये धडक मारली आहे. तर मुंबई, लखनौ आणि गुजरात या तीन संघामध्ये फायनलसाठी लढत सुरु आहे. आयपीएलची स्पर्धा पाहण्यासाठी हजारो चाहते येतात.. सामन्यादरम्यान मुलाने प्रपोज केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले अथवा वाचले असेल.. पण यंदाच्या आयपीएल सामन्यादरम्यान मुलीने प्रियकराला प्रपोज केलेय. हा व्हिडीओ चर्चेत आहे. गुजरात आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये मुलगी गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचे दिसतेय.
21 मे रोजी गुजरात आणि आरसीबी यांच्यादरम्यान साखळी फेरीतील अखेरचा सामना झाला. या सामन्यात गुजरातने आरसीबीचा पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. पण या सामन्यात स्टँडमध्ये वेगळाच नजारा पाहायला मिळाला. एका मुलीने बॉयफ्रेंडला गुडघ्यावर बसून प्रपोज केला. या सुंदर प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मुलीने गुडघ्यावर बसून प्रपोज केल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसतेय. सुरुवातीला मुलगा गांगरलेला आणि भावूक झालेला दिसला. मुलाने स्वत:ला सावरत मुलीला होकार दिला.. त्यानंतर मिठी मारली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
“Swinging for Love at the IPL! 💕🏏 ppl prove that cricket isn’t the only thing they’re passionate about, as they seize the perfect moment amidst the excitement of the match .Emotions run high as love conquers the stadium, unexpected moment. #LoveStands #RCBvsGT #IPL2023 @DunzoIt pic.twitter.com/DcHDB8lzjp
— Mouli (@Mouli_twetz) May 22, 2023
RCB ला पुन्हा एकदा हुलकावणी –
108 कसोटी सामन्यात 48.93 च्या सरासरीने 28 शतकांसह 8416 धावा… २७४ वनडे सामन्यात ५७.३२ च्या सरासरीने ४६ शतकांसह १२८९८ रन्स.. याशिवाय २३७ आयपीएल सामने ७२६३ रन्स, ज्यामध्ये सात शतकं आणि स्ट्राईक रेट १३० चा… ही अचंबित करणारी आकडेवारी आहे द विराट कोहलीची. धावांची इतकी मोठी लूट करुनही या धावाधीशाच्या खजिन्याला आयपीएलच्या ट्रॉफीने पुन्हा एकदा हुलकावणी दिलीय.
बंगळुरुच्या मैदानात कोहलीने रविवारी या हंगामातलं सलग दुसरं शतक ठोकलं आणि प्ले-ऑफच्या आशा पल्लवित केल्या. पण, शुभमन गिलने त्याला शतकी प्रत्युत्तर देत गुजरातला विजयपथावर नेलं आणि कोहलीच्या टीमसाठी प्ले-ऑफचा दरवाजा बंद केला. ७५ आंतरराष्ट्रीय शतके २५ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारतीय कर्णधार त्याशिवाय असे विक्रमांचे महाल रचणाऱ्या कोहलीच्या बंगळुरु टीमने आतापर्यंत तीनदा फायनल गाठलीय तर आणखी पाचदा प्ले-ऑफचं तिकीट मिळवलंय. तरीही आरसीबीचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न १६ मोसमांतनंतरही सत्यात उतरलेलं नाही.
[ad_2]