[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पाकिस्तानच्या गोलंजाजीबाबत रोहित काय म्हणाला, जाणून घ्या…
एका प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणला की, “पाकिस्तान एक मजबूत संघ आहे, पण त्यांच्यासमोर आव्हान मोठे असेल. सामना जिंकण्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. नाणेफेक जिंकली की सामना जिंकता येतो, ही गोष्ट क्वचितच घडते. अल्पकालीन उद्दिष्टे नेहमीच जास्त काळ टिकत नाही. आमचे पहिले उद्दिष्ट पाकिस्तानला पराभूत करणे आहे, मग पुढे पाहू. आमच्याकडे शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ नसतील, परंतु आमच्याकडे ज्या काही गोष्टी आहे त्यांचा उपयोग नक्कीच करू करू.”
भारताच्या Playing xi बाबत रोहितने सांगितले की…
भारतीय संघाच्या निवडीबाबत म्हणाला की, “आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा मोठा ताफा आहे. या अशा परिस्थितीत कधी कधी सामन्यासाठी ११ खेळाडूंची निवड करणे कठीण काम होते. आशिया चषकात कोणताही संघ कमकुवत मानता येणार नाही. कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. आपण केलेल्या प्रत्येक चुकीतून आपण शिकतो. टीम इंडियाच्या फलंदाजांचा अनुभव या स्पर्धेत उपयोगी पडेल. आम्हाला विश्वचषकापूर्वी आमच्या सर्व गोष्टींवर विचार करायचा आहे आणि त्यांची अंमलबजावणीही करायची आहे.”
स्वत:च्या फलंदाजीबाबत रोहित यावेळी स्पष्टपणे म्हणाला की…
रोहित शर्मा म्हणाला, “तुम्हाला गेल्या दोन वर्षांत माझी फलंदाजी जास्त आवडली नसेल. गेल्या दोन वर्षांत मी वेगळ्या पद्धतीचे क्रिकेट खेळलो आहे. फलंदाजीत धोका पत्करला आहे. सलामीवीर म्हणून संघाला चांगल्या स्थितीत ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मी लवकरच चांगल्या लयीत येण्याचा प्रयत्न करेन आणि तेच संघासाठी चांगले असेल. “
[ad_2]