IND Vs PAK Asia Cup 2023 LIVE Score Ishan Kishan Hardik Pandya Team India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: कर्णधार रोहित शर्मा आणि रनमशीन विराट कोहली लवकर तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. आघाडीचे चार फलंदाज झटपट तंबूत परतल्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. त्याचवेळी इशान किशन आणि हार्दिक पांड्या भारताचासाठी संकटमोचक म्हणून आले. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी करत भारताच्या धावसंख्येला आकार दिला. त्यानंतर चौकार आणि षटकार मारत धावसंख्या वाढवली. इशान किशन याने आधी अर्धशतक ठोकले, त्यापाठोपाठ हार्दिक पांड्यानेही अर्धशतक ठोकले. 

हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी पाचव्या विकेटसाठी 100 धावांची भागिदारी करत भारताची लाज राखली. भारताने 66 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या चार फलंदाजांचा समावेश होता. या चारही फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पण पाचव्या विकेटसाठी इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी जबरदस्त भागिदारी केली. हार्दिक पांड्याने 62 चेंडूत अर्धशतक ठोकले तर इशान किशन 54 चेंडूत अर्धशतक ठोकले. 

इशान किशन याने शतकाकडे वाटचाल केली आहे. इशान किशन सध्या 74 धावांवर खेळत आहे. 76 चेंडूत 8 चौकार आणि दोन षटकार मारले. तर हार्दिक पांड्या सध्या तीन चौकारांच्या मदतीने 54 धावांवर खेळत आहे.

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि इशान किशन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.  पाचव्या विकेटसाठी हार्दिक आणि इशान किशन यांच्यामध्ये शतकी भागिदारी झाली आहे. कठीण स्थितीत या दोघांनी भारताची धावसंख्या वाढवण्याचे काम केले.  

आघाडीची फळी ढेपाळली –

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. दोघेही संयमी फलंदाजी करत होते. पाचवे षटक सुरु झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शाहिन आफ्रिदी याने रोहित शर्माला त्रिफाळाचीत बाद करत भारता मोठा धक्का दिला. पहिल्या धक्क्यातून टीम इंडिया सावरणार त्याआधीच शाहिन याने दुसरा धक्का दिला. शाहिन आफ्रिदीने विराट कोहली यालाही त्रिफाळाचीत बाद करत 140 कोटी भारतीयांचा हिरमोड केला.  रोहित शर्मा याने 22 चेंडूत 11 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. तर विराट कोहली याने एका चौकाराच्या मदतीने चार धावा केल्या. रोहित आणि विराट कोहली यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना शाहिन आफ्रिदी याने तंबूचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने डावाची सुत्रे हातात घेतली. अय्यर याने दोन खणखणीत चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. श्रेयस अय्यर आणि गिल भारताचा डाव सावरतील, असे वाटत होते. पण हॅरिस रौफ याने श्रेयस अयय्र याला फखर जमान याच्याकरवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. श्रेयस अय्यर याने 9 चेंडूत दोन चौकाराच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला.



[ad_2]

Related posts