[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mobile Games in India : अनेक दिवसापासून बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया (BGMI) खेळाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या यूजर्सची अखेर प्रतिक्षा संपली आहे. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया, म्हणजेच BGMI गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने या गेमला पूर्णपणे मंजुरी दिली आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी हेरगिरीच्या संशयामुळे कित्येक चिनी अॅप्स आणि गेम्स बंद करण्यात आले होते. यामध्ये PUBG गेमचाही समावेश होता. यानंतर यासारखीच BGMI गेम लाँच झाला होता. मात्र, सरकारने यावर देखील बंदी लागू केली होती. अखेर देशात सरकारने मे 2023 पासून बीजीएमआय पुन्हा सुरू केले. तरीही सरकार दर 3 महिन्यांनी या खेळाचे ऑडिट करेल. पूर्वीप्रमाणेच अॅप्लिकेशनमध्ये कोणतीही अडचण आढळल्यास सरकार या गेमवर पुन्हा बंदी घालू शकते.
गेममध्ये मोठे बदल
BGMI गेमला भारतात परवानगी देताना सरकारने काही बदल सुचवले होते. 18 वर्षाखालील मुलांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच त्यांना हा गेम खेळण्यासाठी पालकांची परवानगीही घ्यावी लागणार आहे. 18 वर्षांवरील लोक दिवसात 6 तास गेम खेळू शकतात.
भारतातील सर्वाधिक कमाई करणारा गेम
BGMI हे Google Play Store वर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अॅप्सपैकी एक आहे. गेल्या वर्षी निलंबनापूर्वी, बीजीएमआय आणि फ्री फायर हे भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अँड्रॉइड अॅप्सपैकी एक होते आणि लाखो लोकांनी डाउनलोड केले होते. आता पुन्हा एकदा या गेमला खेळायची परवानगी दिल्यानंतर देखील हा गेम कमाईत अव्वल स्थानावर आहे.
BGMI चा फूल फॉर्म Battlegrounds Mobile India असा होतो. BGMI हा भारतातील एक लोकप्रिय Battle Royal Game आहे, जो 1 जुलै 2021 रोजी लाँच करण्यात आलेला आहे. Free Fire आणि Call of Duty सारखा हा एक Battle Royal Game आहे. आज BGMI हा भारतातील सर्वात लोकप्रिय Battle Royal Game बनला आहे. आतापर्यंत 1 कोटी Downloads या गेमचे झालेले आहेत व वेगाने वाढत आहेत. साऊथ कोरियाची लोकप्रिय गेम निर्माता कंपनी Krafton ने हा गेम बनवला आहे. ही तीच कंपनी आहे जिने PUBG (Player Unknowns Battleground) गेम बनवला होता. PUBG गेम आधी भारतात खूप लोकप्रिय होता परंतु काही सुरक्षा कारणास्तव गेमला भारतातून कायदेशीर बंदी घालण्यात आली. त्यानंतर कंपनी ने PUBG सारखाच BGMI हा गेम बनवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Upcoming Phones : ‘हे’ स्मार्टफोन्स सप्टेंबर महिन्यात दमदार फिचर्ससह होणार लाँच , पाहा संपूर्ण यादी
[ad_2]