Bhandara News Boy Injured When Mobile Phone Kept In Pocket Explodes

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भंडारा: खिशात ठेवलेल्या मोबाईलमध्ये अचानक बिघाड झाल्यानं स्फोट (Mobile Blast) झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर परिसरात घडली. या घटनेत चांदपूर येथील 12 वर्षीय प्रीतम किशोर वाघरे हा मुलगा जखमी झाला. मुलाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली आहे.

नेमकं काय घडलं?

इयत्ता सातवीत शिकणाऱ्या प्रीतमच्या वडिलांचं प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमान मंदिर देवस्थानच्या आवारात पूजा साहित्य विक्रीचं दुकान आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्यानं प्रीतम नेहमीप्रमाणे वडिलांच्या दुकानात गेला. जाताना सोबत वडिलांचा विवो कंपनीचा मोबाईल त्याने पँटच्या खिशात टाकला आणि तो दुकानाकडे निघाला. दुकानाजवळ पोहोचल्यानंतर त्याला पँटच्या खिशातून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. खिशात ठेवलेल्या मोबाईलमधून धूर निघत असल्याची जाणीव त्याला झाली. हा प्रकार लक्षात येताच प्रीतमने खिशात हात घालून तातडीने मोबाईल बाहेर काढला आणि फेकला.

मोबाईल खिशातून बाहेर काढताच स्फोट झाला 

दरम्यान, मोबाईलचा स्फोट झाला, पण यात प्रीतमचं नशीब बलवत्तर असल्याने मोबाईल बाहेर काढल्यानंतर तो फुटला आणि मोठी दुर्घटना होता होता वाटली. मात्र, पँटच्या खिशात मोबाईलने पेट घेतल्याने त्याच्या पायाला जखम झाली, यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला मदत करून तातडीने खासगी रुग्णालयात नेत उपचार केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी, मोबाईलचा स्फोट झाल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

औरंगाबादमध्येही काही दिवसांआधी घडला असाच प्रकार

औरंगाबादच्या गंगापूर शहरात 11 ऑगस्टला एक धक्कादायक प्रकार घडला. क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थ्याच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने खळबळ उडाली. मोबाईल चार्जिंग झाल्यावर हा 17 वर्षीय विद्यार्थी क्लाससाठी निघाला होता. दरम्यान अचानकच विद्यार्थ्याच्या खिशातील मोबाईलचा आवाज होऊन स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेत विद्यार्थ्याचा पाय भाजला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली.

बीडमध्ये देखील घडली मोबाईलमुळे दुर्घटना

दरम्यान, असाच काही प्रकार गेल्या जुलैमध्ये देखील बीड जिल्ह्यातून समोर आला होता. बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट होऊन सात वर्षाच्या मुलाचं तोंड भाजलं होतं. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी धारूर येथे घडली होती. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आता लेकरांना मोबाईल देताना विचार करण्याची गरज आहे. अनिकेत सोळंके असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव होतं. तर, त्याच्या तोंडाला गंभीर ईजा झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

धक्कादायक! क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट; औरंगाबादमधील घटना

[ad_2]

Related posts