[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
रोहित शर्मा गेल्या सामन्यात ऐन भरात आला होता. रोहितने सुरुवात थोडी सावधपणे केली होती. पण त्यानंतर भाराताची बिन बाद १७ अशी धावसंख्या असताना पाऊस आला. पण पावसानंतर झोडपून काढले ते रोहित शर्माने. कारण पावसानंतर मैदान ओले झाले असले तरी रोहितने त्याची तमा बाळगली नाही. पावसानंतर जेव्हा खेळ सुरु झाला तेव्हा रोहितने धडाकेबाज फटकेबाजीने नेपाळच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने या सामन्यात ५९ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ७४ धावांची दणकेबाज खेळी साकारली. ही खेळी साकारत असताना रोहितने आता एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहितने गेल्या सामन्यात पाच षटाकारांची अतिषबाजी केली. या पाच षटकारांसह रोहितने आता इतिहास रचला आहे. कारण एक सलामीवीर म्हणून २५० षटकार पूर्ण करणारा रोहित हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणत्याही सलामीवीराला वनडे क्रिकेटमध्ये २५० षटकार पूर्ण करता आलेले नव्हते. गेल्या सामन्यात रोहितने एकूण पाच षटकार लगावले आणि वनडे क्रिकेटमधील आपले २५० षटकार पूर्ण केले. त्यामुळे आता रोहितच्या नावावर हा एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. रोहितची सोमवारी खेळी ही भन्नाट होती. कारण पाऊस पडल्यावर खेळपट्टी गोलंदाजीला पोषक होती. पण त्याचवेळी रोहितने गोलंदाजांना आक्रमक होण्याची संधी दिली नाही. कारण रोहितने आक्रडमक पवित्रा घेतला आणि त्यानंतर नेपाळच्या गोलंदाजीतली हवाच काढून टाकली. त्यामुळेच या सामन्यात भारताला विजय मिळवता आला.
रोहित शर्माच्या नावावर आता विश्वविक्रम झाला आहे. रोहितने हाच फॉर्म कायम ठेवला तर वर्ल्ड कपमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.
[ad_2]