[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ashish Nehra After Rahul Dravid : विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कोच म्हणून करार संपणार आहे. राहुल द्रविडला कोच म्हणून अद्याप हवं तितके यश मिळालेले नाही. त्यामुळे विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा पत्ता कट होणार, अशीच चर्चा सुरु झाली आहे. त्याशिवाय राहुल द्रविडनंतर टीम इंडियाच्या कोचची जबाबदारी आशिष नेहराकडे जाणार, अशी चर्चाही सुरु झाली आहे. आशिष नेहरा याने स्वत: याचे उत्तर दिलेय. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, आशिष नेहराला टीम इंडियाचा कोच होण्यात रस नाही.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्याबद्दल क्रीडा विश्वात चर्चेला उधाण आलेय. आशिष नेहरा भारतीय संघाचा पुढील मुख्य कोच होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. आशिष नेहरा सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा कोच म्हणून काम पाहत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने पदार्पणातच जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर 2023 च्या हंगमात गुजरातला उपविजेतेपद मिळाले होते. या यशामध्ये आशिष नेहराचा मोठा वाटा होता.
भारतीय संघाचा विद्यमान मुख्य कोच राहुल द्रविडचा बीसीसीआयसोबतचा करार नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. राहुल द्रविड कार्यकाळ वाढवणार नसल्याचेही समजतेय. अशात टीम इंडियाचा पुढील कोच म्हणून आशिष नेहराची जोरदार चर्चा सुरु आहे. पण पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, नेहराला टीम इंडियाचा कोच होण्यात रस नाही. कारण, नेहराचा गुजरात संघासोबतचा करार 2025 पर्यंत आहे.
बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर राहुल द्रविड आपला कार्यकाळ वाढवणार नाही. कारण, द्रविडला आपला कार्यकाळ चांगल्या स्थितीत संपवायचा आहे. पण माझ्या मते, विश्वचषकानंतर बीसीसीआयने प्रत्येक फॉर्मेटसाठी वेगवेगळा कोच निवडायला हवा. राहुल द्रविडला रेड बॉल क्रिकेटमध्ये कोच म्हणून कायम ठेवायला हवे.
रवी शास्त्री यांच्यानंतर राहुलकडे जबाबदारी
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडने टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून पदभार सांभाळला होता. 2021 च्या टी 20 विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान ग्रुप स्टेजमध्ये संपले होते. त्यानंतर राहुल द्रविडकडे जबाबदारी आली होती. नोव्हेंबर 2021 पासून राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून काम पाहत आहे. आता राहुल द्रविडचा करार विश्वचषकानंतर संपत आहे. राहुल द्रविडची जागा कोण घेणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
[ad_2]