[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Virat Kohli – Rohit Sharma as a pair in ODI : रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. या जोडीला आणखी एक विक्रम करण्याची संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये आतापर्यंत 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम होऊ शकतो.
रविवारी आशिया चषकातील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत सर्वोउत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहित आणि विराटची जोडी पाच हजार धावांची भागिदारी करण्यापासून दोन पावले दूर आहे. दोघांची दोन धावांची भागिदारी होताच पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम रोहित-विराट जोडीच्या नावावर होणार आहे.
वनडे फॉरमॅटमध्येटीम इंडियासाठी आतापर्यंत केवळ 2 जोड्यांनी 5000 धावांचा टप्पा पार पार केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी वनडेमध्ये 8227 धावांची भागिदारी केली आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 5193 धावांची भागिदारी केली आहे. जर रोहित आणि विराट पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरले तर ते हा टप्पा गाठणारी सर्वात जलद जोडी होईल.
रोहित दहा हजार धावसंख्येच्या जवळ –
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून 78 धावा दूर आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 239 डावात 9922 धावा केल्या आहेत.
विराट 13 हजार धावांचा टप्पा पार करणार
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 98 धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकर याने 321 वनडे डावात 13 हजार धावांचा पल्ला पार केला. सचिन तेंडुलकरचा 13 हजार धावांचा पल्ला पार करण्यासाठी 321 डाव लागले होते, विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 21 डाव असतील. विराट कोहलीने 266 डावांमध्ये 12902 धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आशिया चषकात वेगवान 13 हजार धावांचा पल्ला पार करण्याची संधी आहे. 98 धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम विराट कोहली मोडणार आहे.
[ad_2]