Margi Mercury Transit Mercury is moving direct in Leo luck of these zodiac signs will change

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Margi 2023 : बुद्धिमत्ता आणि ज्ञान का कारक बुध ग्रह येत्या काळामध्ये सिंह राशिमध्ये मार्गी होणार आहेत. ग्रहांचा राजकुमार बुध 16 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1:21 वाजता सिंह राशीत मार्गी होणार आहे. बुध मार्गस्थ राहिल्याने काही राशींचा आत्मविश्वास वाढणार आहे. बुधाची मार्गी अवस्था ही सर्व राशींवर परिणाम करणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ज्यावेळी शुभ ग्रहांसह येतो तेव्हा चांगले आणि सकारात्मक परिणाम देतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, व्यवसाय, गणित आणि शिकण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. त्याच्या शुभ स्थितीमुळे व्यवसायात यश मिळतं. दरम्यान बुधाच्या या मार्गी अवस्थेमुळे काही राशींच्या व्यक्तींना भरपूर लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना बुधाच्या मार्गी अवस्थेमुळे लाभ मिळणार आहेत.

वृषभ रास

तुमच्या राशीमध्ये बुध हा दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी आहे आणि तो थेट चौथ्या घरात जाणार आहे. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये बदल हवा असेल तर तुम्हाला या दिशेने प्रगती होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे नशीब उजळणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकतं. कोणत्याही नवीन व्यावसायिक व्यवहारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे परदेशातूनही काही संधी मिळण्याची आशा आहे. 

सिंह रास

सिंह राशीसाठी, बुध हा दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे आणि तो थेट पहिल्या घरात फिरणार आहे. या काळात करिअरमध्येही यशाची शिखरं गाठण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. अनेक नवीन कल्पना मनात येतील. नवीन संधी शोधणाऱ्या लोकांचा शोध पूर्ण होणार आहे. तुमच्या कामामुळे तुमचा आदरही वाढू शकतो. व्यावसायिकांना अधिक नफा मिळविण्याच्या संधीही मिळू शकतात. 

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी, बुध त्यांच्या नवव्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि तुमच्या अकराव्या घरात राहील. या काळात तुमचे उत्पन्न वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या मागील कामाचे फळ मिळू शकतं. व्यवसाय किंवा नोकरीमुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतूनही पैसे मिळतील. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला मालामाल होण्याची संधी मिळणार आहे. 

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी, बुध त्यांच्या सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. त्यांच्या नवव्या घरात थेट फिरत आहे. या काळामध्ये तुम्हाला अशी नोकरी मिळू शकते, जी तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे. या नवीन नोकरीत तुम्हाला आराम आणि समाधान वाटू शकतं. तुम्हाला पैसे मिळतील पण ते धार्मिक कार्य, प्रवास किंवा शुभ कार्यावरही खर्च होऊ शकतात. व्यापार्‍यांनाही या काळात चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल. अचानक भरपूर पैसा हाती येऊ शकतो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts