Ayodhya Ram Mandir Ancient Ruins Found During Excavation For Ram Mandir In Ayodhya( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Janmabhoomi:  राम मंदिर (Ram Mandir) उभारण्यासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीसाठी अनेक प्राचीन मूर्ती आणि स्तंभ आढळले आहेत. राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. महत्त्वाचंं म्हणजे बाबरी मशीद उभी राहण्याआधी इथं राम मंदिर होतं, असा दावा हिंदू पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात केला होता. आपल्या निर्णयात कोर्टानं तो मान्य देखील केला होता. आणि त्याचाच आणखी पुरावा म्हणजे नव्या राम मंदिराच्या बांधकामादरम्यान देखील आता प्राचीन अवशेष सापडले आहेत. 

चंपत राय यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राचीन मंदिराचे अवशेष आणि मूर्ती मिळत आहे. चंपत राय यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटटवरून फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये जे पाषाण आहेत त्यावर  कोरलेल्या मंदिराचे अवशेष दिसतात. त्यात काही दगडी शिल्पेही पाहायला मिळतात. सध्या चित्रात दगडी कोरीव शिल्पे, खांब, दगड आणि देवी-देवतांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी फोटो शेअर करताना लिहिले की, ‘श्री रामजन्मभूमी येथे उत्खननादरम्यान सापडलेल्या प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. त्यात अनेक पुतळे आणि खांबांचा समावेश आहे’. सध्या चंपत राय यांनी याविषयी अधिक माहिती शेअर केलेली नाही. त्याचवेळी, राम मंदिराच्या उभारणीदरम्यान केलेल्या उत्खननात प्राचीन मंदिराचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले, हे सांगण्यात आलेले नाही.

सध्या असा अंदाज वर्तवला जात आहे की, राम  मंदिराच्या उभारणीसाठी पाया खोदत असताना येथे एका प्राचीन मंदिराच्या मूर्ती आणि अवशेष सापडले आहेत. याआधीही राम मंदिरासाठी केलेल्या उत्खननात अशी शिल्पे आणि मंदिराचे अवशेष सापडले होते. अशा परिस्थितीत राम मंदिर परिसरामध्ये एक संग्रहालय बांधण्यात येणार असल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले. ज्यामध्ये उत्खननादरम्यान सापडलेल्या मूर्ती आणि मंदिरांचे अवशेष भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

हे ही वाचा :                                      

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा दरवाजा, जानेवारीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाRelated posts