( प्रगत भारत । pragatbharat.com)
औरंगाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) 17 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार होते. याबाबत अमित शाहांचा औरंगाबाद दौरा देखील आला होता. मात्र शाहांचा हा औरंगाबाद दौरा आता रद्द झाला आहे. 17 सप्टेंबर रोजी अमित शाहा यांचे वेळेचे नियोजन होत नसल्याने, हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमित शाहांच्या दौऱ्याची भाजपकडून आणि प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द झाला आहे.