Asia Cup 2023 Team India Vs Bangladesh Ind Vs Ban Indian Predicted Playing Xi Against Bangladesh No Bumrah Siraj And Hardik Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Predicted Playing XI Against Bangladesh: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला. मंगळवारी (12 सप्टेंबर) रोजी श्रीलंकेला हरवून टीम इंडियानं फायनलचं तिकीट मिळवलं. दरम्यान, फायनलपूर्वी टीम इंडियाला आणखी एक सामना खेळायला लागणार आहे. टीम इंडिया आशिया कपच्या सुपर-4 मधील तिसरा सामना बांगलादेशसोबत खेळणार आहे. तसं पाहायला गेलं तर, बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्याचा निकाल काहीही लागला तरीदेखील टीम इंडियाचं फायनलमधील स्थान पक्क आहे. अशातच बांगलादेशविरोधातील सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियातील सिनियर स्टार प्लेयर्सना विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्यांच्याऐवजी आतापर्यंत एक्स्ट्रामध्ये बसलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. टीम इंडियाचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनीही पत्रकार परिषदेत बोलताना याबाबतचे संकेत दिले होते. त्यामुळे बांगलादेश विरोधात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. 

कोणत्या बदलांची शक्यता? 

बांगलादेश विरोधातील सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज, विकेटकीपर केएल राहुलला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. केएल राहुलऐवजी सुर्यकुमार यादव खेळताना दिसू शकतो. दुखापतीतून सावरल्यानंतर राहुलनं सलग दोन सामन्यांमध्ये बॅटिंग आणि विकेटकिपिंगची धुरा सांभाळली होती. त्यामुळे फायनसाठी त्याला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशन विकेटकिपींग करताना दिसणार आहे. 

याव्यतिरिक्त स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्यालाही आजच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंकेविरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग असलेला अक्षर पटेलचा बांगलादेश विरुद्धच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही सहभाग असण्याची शक्यता जास्त आहे.  

बॉलिंग ऑर्डरमध्येही बदल होण्याची शक्यता 

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला आराम दिला जाऊ शकतो. बुमराहच्या ऐवजी मोहम्मद शामी आणि सिराज यांची कमी शार्दुल ठाकूर पूर्ण करू शकतो. अनुभवी पेसर शामीनं आतापर्यंत आशिया चषकात नेपाळ विरुद्धचा एकच सामना खेळला आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात शामीला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर श्रीलंकेच्या विरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर असलेल्या शार्दुल ठाकूरला आणखी एक संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

बांगलादेशच्या विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा संभाव्य संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, प्रसिद्ध कृष्णा 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PAK vs SL: आधी कोहली-रोहित, मग पाकिस्तानच्या बाबर आझमलाही फिरकीच्या जाळ्यात अडकवलं; श्रीलंकेच्या वेल्लालागेनं भल्याभल्या फलंदाजांना नमवलं

[ad_2]

Related posts