Solapur Drugs Case Police Seized Raw Material Of Md Drug Mohol Kharkhana News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Solapur Drugs : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ड्रग्स (Drugs) प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एमडीसाठी लागणारा 300 किलो कच्चा माल आणि जवळपास 1 हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली. मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसी मधील एस एस केमिकल्स या बंद स्थितीत असलेल्या कंपनीत आरोपीनी हा कच्चा माल ठेवला होता. 

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ कारवाई करत 3 किलो 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले होते. जवळपास 6 कोटी रुपये किमत असलेल्या या ड्रग्जसह पोलिसांनी दत्तात्रय लक्ष्मण घोडके आणि गणेश उत्तम घोडके या दोन आरोपीना देखील अटक केली होती. आरोपीनी तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसीत छापा टाकला होता. तिथेच तब्बल 300 किलो एमडीसाठी लागणारा कच्चा माल आढळून आला. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज प्रकरणात सोलापुरातून अटक केलेले आरोपी गवळी बंधू आणि या प्रकरणातील दोन्ही आरोपींचे संबंध असल्याचे देखील समोर आलं आहे. त्यामुळे गवळी बंधुची मुंबईतील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी सोलापूर पोलीस प्रयत्न करणार आहेत. 

मोहोळ तालुका ड्रग्जचा अड्डा बनतोय का? 

मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंद्याचा मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे.   त्याची एकूण किंमत ही 16 कोटी रुपये इतकी आहे. 

या आधी 2016 साली या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती, त्यावेळीही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. आता पुन्हा आठ वर्षांनी त्याच ठिकाणी छापेमारी करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. तसेच आजही सोलापूर पोलिसांनी कावाई करत सहा कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. त्यामुळे मोहोळ पुन्हा एकदा ड्रग्जचा अड्डा बनतोय का असा प्रश्न विचारला जात आहे.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts