Ind Vs Nz Head To Head In Icc Odi World Cup 2023 India Have Not Won Against New Zealand In 20 Years

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs NZ Head To Head In ODI World Cup : रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आमना सामना होत आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघामध्ये प्रथम क्रमांकासाठी लढत असेल. पण विश्वचषकाचा इतिहास पाहता न्यूझीलंडचे पारडे जड दिसत आहे. मागील 20 वर्षांत भारताला न्यूझीलंडविरोधात एकही सामना जिंकता आलेला नाही.

गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंडला मागील 20 वर्षांत वर्ल्ड कपमध्ये भारताला एकदाही पराभूत करता आले नाही. न्यूझीलंडने भारताला प्रत्येक आयसीसी स्पर्धेत पराभूत केले आहे. मग  2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन असो किंवा इतर कोणताही सामना… न्यूझीलंडविरोधात विश्वचषकात भारताची कागिरी खराबच राहिली आहे.  2019 च्या विश्वचषकातील पराभव तर आजही भारतीय विसरले नाहीत. मागील 20 वर्षांत भारताला विश्वचषकात न्यूझीलंडचा पराभव करता आलेला नाही.

न्यूझीलंडविरोधात विश्वचषकात भारताची कामगिरी खराबच –
भारतीय संघाने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचं 2003 मध्ये पराभूत केले होते. सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषकात न्यूझीलंडला हरवलं होते. तेव्हा विराट कोहली 14 वर्षांचा होता, तर रोहित शर्मा 16 वर्षांचा होता. गौतम गंभीर आणि एमएस धोनीने तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही केले नव्हते. भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन 20 वर्षांचा काळ ओलांडला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ न्यूझींलडला हरवणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे. 

हेड टू हेड आकडे काय सांगतात ?

विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने पाच सामन्यात बाजी मारली आहे. तर भारताला फक्त तीन सामने जिंकता आले. एका सामन्याचा निकाल लागल नव्हता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 1975 च्या विश्वचषकात झाला होता. तर अखेरचा सामना 2019 मध्ये झाला होता. त्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला होता. भारताने विश्वचषकात न्यूझीलंडला अखेरचे 2003 मध्ये पराभूत केले होते. 

वनडेतील आकडेवारी काय – 

वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यंत 116 सामने झाले आहेत. त्यामध्ये भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंडला 50 सामन्यात विजय मिळाला आहे. सात सामन्याचा निकाल लागला नाही. आता रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

भारतीय संघ दमदार फॉर्मात

विश्वचषकात भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे. भारतीय संघाने सलग चार सामन्यात विजय मिळत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर कब्जा मिळवला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा पराभव करत चार गुणांची कमाई केली आहे. न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ या स्पर्धेत अजेय आहेत. इतर आठ संघांना पराभवाचा सामना करावा लागला. आता नंबर एक आणि नंबर दोन यांच्यामध्ये सामना होणार आहे. विजेता संघ गुणातालिकेत अव्वल स्थान पटकावेल. 



[ad_2]

Related posts