India Vs Bangladesh Colombo Weather Forecast Asia Cup 2023 Ind Vs Ban Match Today Know Updates

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND Vs BAN Rain Asia Cup 2023: टीम इंडिया (Team India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात आशिया कप 2023 च्या सुपर-4 चा शेवटचा सामना खेळवला जाईल. टीम इंडियानं आशिया चषकाच्या फायनलमध्ये आधीच आपलं स्थान पक्कं केलं आहे. तर बांगलादेश आधीच स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्यामुळे आजच्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरीदेखील स्पर्धेच्या समिकरणावर कोणताही परिणाम होणार नाही. आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडिया श्रीलंकेशी भिडणार आहे. पण त्यापूर्वी बांगलादेशसोबत टीम इंडियाला सामना खेळावा लागणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. अशातच त्यापूर्वी कोलोंबोतील हवामानाचे अपडेट्स समोर आले आहेत. हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्या पावसाची दाट शक्यता आहे. 

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. हवामान खात्यानुसार, दुपारी 3 वाजता पाऊस पडू शकतो. यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे. पण 8 वाजल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू होऊ शकतो. सकाळी 10 च्या सुमारास कोलंबोमध्ये आकाश निरभ्र असेल, तसेच ऊनही असेल. पण त्यानंतर काही काळासाठी ढगाळ वातावरण होऊ शकतं. सामन्यापूर्वी पाऊस पडल्यास टॉसला उशीर होऊ शकतो.

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. भारतीय क्रिकेट संघ हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देऊ शकतो. तर शार्दुल ठाकूर किंवा अक्षर पटेल यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकतं. टीम इंडिया मोहम्मद शामी आणि तिलक वर्मा यांनाही आजमावू शकते. भारतीय संघाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची ही चांगली संधी आहे. 

टीम इंडिया बांगलादेश यांच्यातील सामन्यासाठी संभाव्य संघ 

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), तिलक वर्मा/हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल/शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज

बांगलादेशची संभाव्य प्लेईंग-11

मेहदी हसन मिराज, मोहम्मद नईम/तनजीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद हृदोय, अफिफ हुसैन, शमीम हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, हसन महमूद

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts