India Bangladesh Shubman Gill Ind Vs Ban Asia Cup 2023 Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलंबो : आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला सहा धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात बांगलादेश संघाने भारताचा सहा धावांनी पराभव केला. बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २५९ धावांत संपुष्टात आला. बांगलादेशने भारतासमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरदाखल भारतीय संघाने २५९ धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. 

शुभमन गिल याचे शतक आणि अक्षर पटेल याची जिगराज ४२ धावांची खेळी वगळता इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. गिल-अक्षरचा अपवाद वगळता भारताच्या इतर एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या पार करता आली नाही. रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार, इशान किशन आणि रविंद्र जाडेजा हे फलंदाज अपयशी ठरली. 

एका बाजूला विकेट पडत असताना शुभमन गिल याने दुसऱ्या बाजूला संयमी फलंदाजी केली. शुभमन गिल याने १२१ धावांची दमदार खेळी केली. गिल याने पाच षठकार आणि आठ चौकार ठोकले. गिल याचा अपवाद वगळता अक्षर पटेल याने ४२ धावांची खेळी केली. अक्षर पटेल याने दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांना चांगली सुरुवत मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही. केएल राहुल याने १९ तर सूर्यकुमारने २६ धावांची खेळी केली. शार्दूल ठाकूर याने ११ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या पार करता आला नाही. पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला पाच धावांचे समाधान मानावे लागले. 

दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी रोहित शर्माचा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. अवघ्या ५९ धावांत बांगलादेश संघाने आघाडीचे चार फलंदाज गमावले.  मोहम्मद शामी आणि शार्दूल ठाकूर यांनी सुरुवातीला भेदक मारा केला. सलामी लंदाज हसन याला १३ धावांवर शार्दूलने तंबूत धाडले. लिटन दास याला मोहम्मद शामीने तंबूचा रस्ता दाखववला. मेहंदी हसन मिराज याला अक्षर पटेल याने बाद केले तर अनामुल हक याला शार्दूल ठाकूर याने बाद केले…. भारतीय संघाने बांगलादेशची आघाडीची फळीला तंबूत पाठवले होते. पण कर्णधार शाकीब याने जिगरबाज खेळी केली. 

एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार शाकीब हल हसन याने जिगरबाज खेळी केली. शाकीब हल हसन याला  तौहीद ह्रदय याने चांगली साथ दिली.  शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी करत बांगलादेशचा डाव सावरला. ही जोडी धोकादायक होतोय असे वाटत होते, त्याचवेळा शार्दूल ठाकूर याने शाकीबला बाद केले. 

शाकीब अल हसन याने ८५ चेंडूत ८० धावांची खेळ केली. या खेळीत शाकीब अल हसन याने तीन षटकार आणि सहा चौकार ठोकले. तौहीद ह्रदय याने ८१ चेंडूत ५४ धावांची संयमी खेळी केली. तौहीद ह्रदय याला मोहम्मद शामी याने तंबूत धाडले. तौहीद ह्रदय याने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. एस हुसैन याला मोठी खेळी करता आली नाही.. हुसैन फक्त एका धावेवर जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. 

नसुम अहमद याने मेहंदी हसन याच्यासोबत अखेरीस फटकेबाजी करत  धावसंख्या वाढवली नसुम अहमद याने मोक्याच्या क्षणी ४४ धावांची खेळी केली.  या खेळीत नसुम याने  ४५ चेंडूत सहा चौकार आणि एक षठकार लगावला. प्रसिद्ध कृष्णा याने नसुम याला बाद केले. अखेरील मेहंदी हसन आणि सकीब यांनी जोरदार फटकेबाजी करत बांगलादेशला २५० पार नेले. 

गोलंदाजी शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामी याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याला एक विकेट मिळाली.  अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

 

[ad_2]

Related posts