Pakistan Naseem Shah Is Likely To Be Ruled Out Of The World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Naseem Shah Pakistan : विश्वचषकाला काही दिवस शिल्लक राहिले असतानाच पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतग्रस्त झालाय. आशिया चषकात भारताविरोधात खेळताना नसीम शाह दुखापतग्रस्त झालाय. मीडिय रिपोर्ट्सनुसार, विश्वचषकाच्या काही सामन्यासाठी नसीम शाह याला संघाबाहेर बसावे लागू शकते. पाच ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. नसीम शाह याच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ या त्रिकुटापुढे जगभरातील आघाडीचे फलंदाजही गुडघे टेकतात. याच तिकडीमधील दोन गोलंदाज आशिया चषका दुखापतग्रस्त झाले आहेत. हॅरिस रौफ याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आलेय. पण नसीम शाह याला मैदानावर परतण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. नसीम शाह विश्वचषकाच्या सुरुवातीच्या काही सामन्यासाठी उपलब्ध नसल्याचे समजतेय. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, नसीम शाह विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

नसीम शाह सध्या दुबईत उपचार घेत आहे. तेथे स्कॅन केले जातील. नसीमच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर नसीम मैदानाबाहेर गेला. त्यानंतर नसीम शाह आशिया चषकातून बाहेर गेलाय. यानंतर पाकिस्तानने त्याला विश्रांतीही दिली. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रौफ आणि नसीम सहभागी नव्हते. रौफने शेवटचा सामना भारताविरुद्ध खेळला. नसीमने टीम इंडियाविरुद्ध शेवटचा सामनाही खेळला होता.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांच्या दुखापतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, बाबर आझम म्हणाला की, याबद्दल मी नंतर बोलेन. प्लॅन बी वर आत्ताच काही सांगू शकत नाही. पण हो, हरिस रौफची प्रकृती ठीक आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. विश्वचषकापूर्वी तो बरा होईल. नसीम शाहही सुरुवातीच्या काही सामन्यामधून बाहेर होऊ शकतो. मला अद्याप रिकव्हरीबद्दल माहिती नाही. मी फक्त माझे मत देत आहे.

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.[ad_2]

Related posts