Asia Cup 2023 Final Ind Vs Sl Rain Chance If Match Abandoned India Sri Lanka Will Be Joint Winners

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता आज रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे.  भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती.  रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण फायनलला जर पाऊस आला तर काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आशिया चषकाच्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण राखीब दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर फायनलचा सामना पावसामुळे धुतला गेला तर दोन्ही संघाना जेतेपद दिले जाईल.

आशिया चषकाची फायनल आज, 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. फायनल सामन्याला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण श्रीलंकामध्ये पावसाने सध्या दमदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह कोसळधार पडत आहेत.   पावसामुळे काही सामने रद्द करावे लागले होते. तर काही सामन्यात पावसाने प्रभाव पाडला होता.  

सुपर फोर फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका संघाचा पराभव करत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र शेवटच्या सुपर फोरच्या सामन्यात  बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. श्रीलंकेने सुपर फोरचे सामनेही जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. एका सामन्यात भारताकडून त्याचा पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास तो राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशीही पाऊस पडल्यास भारत-श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. 

आशियाई क्रिकेट परिषदेने 18 सप्टेंबर (सोमवार) हा अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. अंतिम सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2002 चा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला, त्यानंतर भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता बनवण्यात आले होते. आज आशिया चषखाची फायनल रंगणार आहे.

[ad_2]

Related posts