( प्रगत भारत । pragatbharat.com)
Brain Teaser : ब्रेन टीझर म्हणा किंवा ऑप्टीकल इल्युजन म्हणा. नजरेला भास होणारं एखादं चित्र समोर येतं आणि त्या चित्राकडे पाहताना आपण भारावून जातो. असाच एक Brain Teaser फोटो मागच्या काही दिवसांपासून तुमच्याही नजरेत आला असेल. तुम्ही स्क्रोल करता करता या फोटोकडे दुर्लक्षही केलं असेल. पण, आता मात्र तसं होणार नाही. कारण, आता या फोटोवरून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे.
आमच्या नजरेतून काहीच सुटत नाही असं तुम्हीही म्हणता का? खरंच असं म्हणत असाल तर हे घ्या तुमच्यासाठी एक CHALLANGE…
सुट्टीच्या दिवशी घरात बसून, हातात फोनवर सतराशे साठ रील्स पाहून कंटाळला असाल तर आता हा वर दिलेला फोटो व्यवस्थित पाहा. तुम्हाला या फोटोमध्ये नेमकं काय दिसतंय? डोकं चक्रावलं ना? तुम्ही बरोबर ओळखलंय, हा ऑप्टीकल इल्यूजनचाच एक फोटो आहे. यामध्ये एका महिलेची सावली दिसत आहे. पण, ही एक सावली नसून अनेक सावल्या आहेत. आता या इतक्या साऱ्या सावल्यांमध्ये नेमकी खरी सावली कोणती हे तुम्हाला शोधून दाखवायचंय. त्यामुळं फोटो व्यवस्थित पाहा बरं.
काही सापडलंय का? प्रत्येक सावली पाहा, तिचा आकार, चेहऱ्याचा आकार पाहा. काहीतरी वेगळेपण आढळतंय का? एका क्षणानंतर तुमचं डोकं गरगरू लागेल पण, वेगळी सावली काही सापडणार नाही. थोडक्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा ठेवता हेच इथं महत्त्वाचं आहे. पटतंय का?
हे घ्या आणखी एक कोडं…
इथं आता तुम्हाला खाली देण्यात आलेल्या फोटोमधून एका सावलीवजा आकातून तयार झालेला शब्द शोधायचा आहे. प्रथमदर्शनी हा एखाद्या व्यक्तीचा चेहराच असल्याचं लक्षात येत आहे. आता हा चेहरा व्यवस्थित पाहा, कारण त्यात एक शब्द दडला आहे.
पहिल्या फोटोमध्ये पाहून काही लक्षात येत नसेल तर दुसऱ्या फोटोमध्ये पाहा आणि तेही जमत नसेल तर तिसरी आकृती व्यवस्थित पाहा. या तिसऱ्या आकृतीतून तर तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे कारण तो शब्द फार कठीणही नाहीये.
कळत नकळत इंग्रजीतून संवाद साधताना हा शब्द सर्रास वापरला जातो. शोधा शोधा… व्यवस्थित शोधा. प्रत्येक आकृती उभी, आडवी, तिरपी करून पाहा शब्द दिसेलच आणि नाहीच दिसला तर आता त्याचं उत्तर इथं पाहूनच घ्या.
या आकृत्यांमधून तयार होणारा शब्द आहे L-I-A-R! व्यवस्थित पाहा, आकृतीच्या नाकातून L तयार होतोय, त्याच्याच पुढं I आहे. तिथून थोडं खाली A आणि R सुद्धा तयार होत आहेत. थोडक्यात तयार झालेला हा शब्द आहे ‘लायर’.