India Australia Odi Series Ind Vs Aus Mohali Stats And Records Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs AUS 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (odi series) खेळवली जाणार आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीचा सामना हा मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या मैदानावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन संघानं चांगली कामगिरी केली आहे. पाहुयात आजपर्यंतचा या मैदानवरचा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाबरोबरचा इतिहास

भारत मोहालीच्या मैदानावर विजयाचा श्रीगणेशा करणार का ?

मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाची आजर्यंतची कामगिरी खूपच खराब आहे.  आजपर्यंत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला वनडे फॉरमॅटमध्ये मोहालीच्या मैदानावर पराभूत करु शकला नाही. या मैदानावर कांगारूंनी वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाला प्रत्येक वेळी पराभूत केले आहे. त्यामुळं 22 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यात भारत मोहालीच्या मैदानावर विजयाचा श्रीगणेशा करणार का हे पाणं महत्वाचं ठरणार आहे. 

भारतीय वेळेनुसार 22 सप्टेंबरला दुपारी दीड वाजता होणार सामना

मोहाली येथे ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे भारतीय संघासाठी आजपर्यंतचा इतिहास पाहता सोपे राहिले नाही. आतापर्यंतच्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मात्र, भारतीय संघाला मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून नवा विक्रम करण्याची संधी आहे. त्यामुळं आता मोहालीच्या मैदानावर वनडे फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करण्यात भारतीय संघ यशस्वी होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे. 

भारतीय मैदावरचा इतिहास काय?

वनडे फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 146 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 54 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर ६७ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 30 वेळा पराभव केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

ODI Rankings : आशिया चषक जिंकूनही भारत दुसऱ्या क्रमांकावर, पाकिस्तान अव्वल

[ad_2]

Related posts