Ipl 2023 Closing Ceremony Live Streaming Date Timings Venue Broadcast Performers Details 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CSK vs GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सामना होणार आहे. आयपीएल 2023 च्या विजेतेपदाचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी समारोप सोहळा आयोजित केला जाणार आहे. या क्लोजिंग सेरेमनीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. आयपीएल 2023 सांगता सोहळा (IPL 2023 Closing Ceremony) संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल.

आज धुमधडाक्यात होणार IPL 2023 ची सांगता

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या सोळाव्या हंगामाचा शेवट 28 मे रोजी अहमदाबादमध्ये होईल. आज, रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरीचा महामुकाबला रंगणार आहे. आयपीएल स्पर्धा क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. या स्पर्धेचा शेवट आज मनोरंजनाने समृद्ध अशा समारोप समारंभानं (IPL Closing Ceremony 2023) होईल. अरिजित सिंह, रश्मिका मंदान्ना आणि तमन्ना भाटिया यांसारख्या स्टार्सनं,आयपीएल 2023 च्या उद्घाटन समारंभाला (IPL Opening Ceremony 2023) हजेरी लावली होती. आज आयपीएलच्या सांगता समारंभही अनेक दिग्गज स्टार्स सामील होणार आहेत.

आयपीएल 2023 चा सांगता समारंभ कोठे पाहायला मिळेल आणि हा जंगी सोहळा कसा असेल, याबाबत सर्व बाबी सविस्तर जाणून घ्या.

IPL 2023 Closing Ceremony : आयपीएल 2023 चा सांगता सोहळा कधी आहे?

आयपीएल 2023 चा सांगता सोहळा 28 मे रोजी अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यापूर्वी होणार आहे.

IPL Closing Ceremony Venue : आयपीएल 2023 चा समारोप समारंभ कुठे होणार आहे?

आयपीएल 2023 चा समारोप सोहळा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

IPL 2023 Closing Ceremony Time : सांगता सोहळा किती वाजता सुरू होईल?

आयपीएल 2023 चा समारोप सोहळा संध्याकाळी 06:00 वाजता (IST) सुरू होईल.

IPL Closing Ceremony on TV : आयपीएल 2023 चा समारोप सोहळा दूरदर्शनवर कुठे पाहता येणार?

आयपीएल 2023 चा सांगता सोहळा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

IPL Live Streaming : येथे पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग

आयपीएल 2023 चा सांगता सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲप आणि वेबसाइटवर मोफत उपलब्ध असेल.

IPL 2023 Closing Ceremony Guest : आयपीएलच्या सांगता सोहळ्याला ‘या’ स्टार्सची हजेरी?

किंग, डिव्हाईन, जोनिता गांधी आणि न्यूक्लिया आयपीएल 2023 च्या समारोप समारंभात सादर करणार आहेत. या सोहळ्यात रणवीर सिंह आणि ए.आर. रहमान यांचे परफॉर्मन्स होण्याची शक्यता असून त्यासाठी बोलणी सुरू आहेत. पण त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts