ODI World Cup 2023 Prize Money Details Winner Runner-Up Know Complete Details ICC Mens WC 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ODI World Cup 2023 Prize Money: क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला अवघा दोन आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे.  भारतात होणाऱ्या विश्वचषकाची गल्ली, दिल्ली ते जगातील सर्व क्रीडा चाहते वाट पाहत आहेत. पाच ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम आयसीसीने आज जाहीर केली आहे. स्पर्धेत बक्षीसांवर 10 मिलिअन डॉलरची उधळण होणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 82 कोटी 93 लाख 55 हजार रुपये इतकी होतेय.  म्हणजेच, विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधींची उधळण होणार आहे. 

कुणाला किती मिळणार बक्षीस ?

भारतात होणारी विश्वचषक स्पर्धा पाच ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. दहा संघामध्ये रनसंग्राम होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी विजेता मिळणार आहे. विजेत्या संघाला तब्बल ३३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या संघाला १६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर सेमीफायनलमध्ये आ्हान संपणाऱ्या दोन्ही संघाला प्रत्येकी सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये आव्हान संपलेल्या संघाला प्रत्येकी ८२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला संघाला चार मिलिअन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेता संघाला दोन मिलिअन डॉलरवर समाधान मानावे लागेल. विजेता संघ ३३ कोटी तर उपविजेता संघ १६ कोटींचे बक्षीस घेईल. साखळी फेरीमध्ये प्रत्येक विजयाला ३३ लाख (USD 40,000) रुपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय साखळी फेरीत आव्हान संपणाऱ्या संघाला ८२ लाख ( 100,000 USD) रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये यंदाची स्पर्धा – 

राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने दहा संघामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला 9 सामने खेळावे लागणार आहेत. वनडे क्रिकेट विश्वचषकात तिसऱ्यांदा राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. याआधी 2019 आणि 1992 मध्ये राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने विश्वचषक स्पर्धा झाली होती. 2019 मध्ये इंग्लंडने तर 1992 मध्ये पाकिस्तानने विश्वचषक उंचावला होता.

राउंड रॉबिन फॉर्मेट काय आहे ?

राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती. राउंड रॉबिन पद्धत म्हणजे, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, बांगलादेश, अफगाणिस्तान अथवा इतर कोणताही कमकुवत संघ टॉप 4 मध्ये पोहचू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचल्यानंतर नॉकआऊट पद्धतीने सामने होतील. पहिल्या क्रमांकावर असणारा संघ चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत खेळेल तर दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या संघासोबत खेळेल. त्यानंतर विजेत्या दोन संघामध्ये फायनलचा थरार रंगेल.   

दहा संघ कोणते ?

भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड हे संघ पात्र ठरले आहेत.  



[ad_2]

Related posts