NCP Ajit Pawar Faction Filed Disqualification Petition Against Sharad Pawar Faction Know These Mla One Mla Exclude From List

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत.  शरद पवार ( Sharad Pawar ) गटाकडून अजित पवार गटाच्या  ( Ajit Pawar ) विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. याचिकेत समाविष्ट केलेल्या आमदारांची नावे ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहेत.

अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात विधिमंडळात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटातील 11 पैकी 10 आमदारांविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून एका आमदाराचे नाव वगळण्यात आले आहे. 

शरद पवार गटातील 10 आमदारांच्या विरोधात याचिका (Sharad Pawar NCP Faction)

अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली. पक्ष विरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

अजित पवार गटाकडून विधिमंडळात दाखल केलेल्या याचिकेत 11 पैकी 10 शरद पवार गटातील आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. 

विधानसभेतील या आमदारांविरोधात याचिका

1) जयंत पाटील

2) जितेंद्र आव्हाड

3) रोहित पवार

4) सुमन पाटील

5) सुनील भुसारा

6) प्राजक्त तनपुरे

7) बाळासाहेब पाटील

8) अनिल देशमुख

9) राजेश टोपे 

10) संदीप क्षिरसागर 

विधान परिषदेतील या आमदारांविरोधात याचिका

1) शशिकांत शिंदे

2) अरुणकाका लाड

3) एकनाथ खडसे

कोणत्या आमदाराचे नाव वगळले?

अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील एका आमदाराचे नाव वगळले आहे. याचिकेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं नाव नाही. 

अजित पवारांना पाठिंबा देणारा खासदार कोण?

राष्ट्रवादीच्या गोटातील राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून शरद पवार  ( Sharad Pawar ) गटातील आणखी एका खासदाराचे आणि एका आमदाराचे समर्थन अजित पवारांना ( Ajit Pawar ) असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोघांनीही त्यांचं प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांना समर्थन देणारा तो खासदार कोण, अशी चर्चा रंगली आहे. 

इतर संबंधित बातमी :

[ad_2]

Related posts